Pune Crime News | पुण्यात ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू, 17 तासानंतर वडगाव शेरी चौकातील टँकर बाजूला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे नगर रस्त्यावर दुर्दैवी घटना घडली आहे. वडगाव शेऱी चौकाजवळ टँकर पलटी झाला होता या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, या वाहतुक कोंडीत 62 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कुटुंबियांसोबत उपचारासाठी जात असताना वाहतूक कोंडीतून वाट न मिळाल्याने तसेच महिलेला कोणत्याही प्रकराची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे कारमध्ये गुदमरुन महिलेचा मृत्यी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Crime News)

नगर रोडवरील टँकरमधून झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाच्या कामगिरीमुळे पुण्यात मोठा धोका टळला आहे. दरम्यान टँकर पलटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने आणि रस्त्यावर हा पदार्थ सांडल्याने पोलिसांनी वाहतूक पर्य़ायी मार्गाने वळवली. मात्र सकाळी कार्यालयाची वेळ असल्याने नगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. (Pune Crime News)

या दरम्यान एक 62 वर्षीय आजारी महिला उपचारासाठी कुटुंबीयांसोबत कारमधून रुग्णालयात जात होती. मात्र, वाहतूक कोंडीत त्यांच्या कारला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे महिलेला वेळेवर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे महिलेचा कारमध्येच गुदमरून मृत्यू झाला. वेळेवर महिलेला वाट मिळाली असती, वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. मात्र, दुर्दैवाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी काय आहे घटना?

सोमवारी मध्यरात्री 12.47 वाजता रस्त्यावर वडगाव शेरी चौकालगत एक गॅस असलेला टँकर पलटी झाला. त्यामधुन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अग्निशमन दल नियंत्रण कक्षामध्ये समजले. घटनेचे गांभीर्य़ ओळखून पुणे अग्निशन दलाकडून मदत घटनास्थळी रवाना करण्यात आली. जवानांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदर वायु हा इथिलीन ऑक्साईड असल्याचे समजताच हा वायू ज्वलनशील व धोकादायक असून हा पाण्यात विरघळणारा असल्याने जवानांनी तात्काळ टँकरवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. चारी बाजूने पाण्याचा फवारा मारण्यात येत होता. त्याचवेळी परिसरातील हॉटेल तसेच इतर इमारती व रहिवाशी यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. पुणे महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल व एमआयडीसी अशा एकूण 10 वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या उपस्थितीत 6 अग्निशमन अधिकारी तसेच 70 -80 जवानांनी कामगिरी चोख बजावली.

सदर टँकर क्रमांक एमएच 04 एफजे 7245 हा 5.5 बार प्रेशरने भरलेला 08 टन इथिलीन ऑक्साइड हा अत्यंत धोकादायक
वायु घेऊन रिलायंस पेट्रोकैमिकल्स कंपनी, नागोठणे, मुंबई येथून उस्मानाबाद येथे बालाजी कंपनी येथे निघाला होता.
तसेच हा टँकर बालाजी रोड सर्व्हिसेस ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्या मालकीचा होता.
राञी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षामार्फत रिलायंस पेट्रोकैमिकल्स आणि बालाजी कंपनी यांना संपर्क साधून
घटनेची माहिती देऊन ताबडतोब मदत पाठवण्यास सांगितले असता पहाटे सहाच्या सुमारास रिलायन्स पेट्रोकेमिकल्स
तज्ञ सेफ्टी ऑफिसर मिलिंद कुलकर्णी घटनास्थळी दाखल होऊन पुढे त्यांच्या पथकाने नायट्रोजन व क्रेनची मदत मागविली.

त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास भैरवनाथ कंपनीच्या पंधरा टनाच्या दोन क्रेन व नायट्रोजन (15 सिलेंडर) असलेला टेम्पो दाखल होऊन टँकर उभा करण्याचे कार्य सुरू केले व पुढे तासाभरात क्रेनच्या साह्याने टॅंकर उभा केला व त्यानंतर नायट्रोजनच्या दाबाचा वापर करुन अपघातग्रस्त टँकरमधून वायु दुसरया टँकरमध्ये घेण्यात आला. यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचा मारा सातत्याने करीत होते. कारण जर यावेळी दुर्घटना घडली असती तर सदर परिसरात मोठी हानी झाली असती. या सर्व प्रक्रियेला सुमारे सोळा तासाचा अवधी लागला. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर अग्निशमन दलाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, जणू कालची रात्र वैऱ्याची होती, कारण इथिलीन ऑक्साइड हा
वायू मोठ्या प्रमाणात ज्वलनशील असल्याने धोका फार मोठा होता.
दलाचे अधिकारी व जवान यांनी परिस्थिती उत्तमरित्या हाताळली व शहरातील मोठी दुर्घटना टाळली तसेच
रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस यंत्रणा व वाहतुक विभाग तसेच नागरिकांनी मोठे सहकार्य केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | ‘जिलब्या गँगला जो कोणी नडणार, त्याची…’ दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

NCP MP Supriya Sule | शिक्षण मंत्र्यांची उमेदवार मुलीला भर कार्यक्रमात ‘डिस्कॉलिफाय’ करण्याची धमकी, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…