Pune Crime News | दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकी, चौघांवर विनयभंगाचा FIR; कल्याणीनगर येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) करुन महिलेचा विनयभंग (Molestation) केला. तसेच वडगाव शेरी परिसरातून परत जात असताना चारकी गाडीतून आणि दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी भररस्त्यात गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देत विनयभंग केला. हा प्रकार (Pune Crime News) वडगाव शेरी आणि कल्याणी नगर येथील सार्वजनीक रोडवर 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला आहे.

याबाबत वानवडी येथे राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन माधवराव नरहरे Madhavrao Narhare (वय-60 रा. वडगाव शेरी), चारचाकी गाडी मधील अनोळखी दोन जण आणि दुचाकीवरुन (एमएच 12 एनके 3049) आलेल्या व्यक्तीविरुद्ध आयपीसी 354, 354 अ, 341, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मुलीला घेऊन वडगाव शेरी परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी माधवराव नरहरे यांनी अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग केला. त्यानंतर महिला मुलीला घेऊन त्यांच्या चारचाकी गाडीतून वानवडी येथे घरी जात होत्या. त्यावेळी कल्याणीनगर येथील बिशप स्कुल (Bishop School Kalyaninagar) समोरील सार्वजनिक रोडवर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीला चारचाकी आडवी लावून आडवले. तसेच महिलेच्या कार चालकाला शिवीगाळ केली.

त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी व्यक्तीने केलेली तक्रार मागे घे अन्यथा जीवंत सोडणार नाही,
अशी धमकी दिली. तसेच महिलेला शिवीगाळ करुन त्यांचे केस पकडून गाडीतून बाहेर काढत विनयभंग केला.
यावेळी गाडीचे चालक महिलेला सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण
केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ST च्या आगार प्रमुखासह वाहक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांनी कांद्याबाबत 6 प्रश्न विचारत सरकारला घेरलं, म्हणाले-
‘सरकारची अशी ही बनवाबनवी…’