Pune Crime | ‘एक भी पोलीसवाला ढंग का नही है, पैसा कमाने के लिए खडे हो क्या?’ पुण्यात कारचालकाने वाहतूक पोलिसास नेले 800 मीटर फरफटत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Crime | पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची ४०० रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्याला ७०० ते ८०० मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) प्रशांत श्रीधर कांतावर Prashant Sridhar Kantaver (वय ४३, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय ४३) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. २५३/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड (kharadi bypass road) व साईनाथ नगर (Sainath nagar) आणि झेन्सॉर कंपनी (Zensor Company) फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु (API Rajguru) यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते.
त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा ४०० रुपयांचा दंड आहे.
तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित “एक भी पोलीसवाला ढंग का नही है, पैसा कमाने के लिए खडे हो क्या”
असे बोलत दंडाची रक्कम न भरता त्यांनी जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी (Pune Crime) घातली.
अंगावर गाडी येत असल्याचे पाहून त्यांनी बॉनेटवर धरले.
ते गाडीवर लटकत आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यांनी हवालदार यांना ७०० ते ८०० मीटर अंतरावर घेऊन गेला.
यामध्ये जायभाय यांच्या उजवे हाताचे कोपरास व बोटाला दुखापत (Pune Crime) झाली आहे.
पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | ‘Not a single cop is polite, stand up to make money?’ In Pune, the driver drove 800 meters to the traffic police, mundhwa signal chowk pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित; सोनिया गांधींचा नेत्यांना सूचक संदेश

Parenting | मुलांच्या ‘या’ 7 गोष्टी चुकीच्या मार्गाला जाण्याचे संकेत, दिसताच व्हा सावध; जाणून घ्या

LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत मोदी सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येतील पैसे?