Pune Crime | अधिकार्‍यांनीच एजन्सीबरोबर संगनमत करुन केला 20 लाखांचा घोळ ! महावितरणच्या दोघा अधिकार्‍यांसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महावितरणच्या (mahavitaran) दोघा अधिकार्‍यांनी कंत्राटदार कंपनीच्या मालकांशी संगनमत करुन तब्बल १८ लाखाहून अधिक युनिटचे बिल आकारणी केली नाही तसेच साडेतीन लाख रुपयांची नवीन वीज मिटरचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला (Pune Crime) आहे.

 

 

याप्रकरणी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी हरिहर जगतसिंग गोठवाड (वय ५२, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात Chakan Police Station (गु. र. नं. १२३६/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राहुल अशोक डेरे (Deputy Executive Engineer Rahul Ashok Dere), सहायक अभियंता शरद विश्वासराव जगदाळे (Assistant Engineer Sharad Vishwasrao Jagdale), सिक्युअर एजन्सी/कंपनीचे पदाधिकारी आणि तिरुपती इंजिनिअरिंग कंपनी (Tirupati Engineering Company) व प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील (Khed Taluka) निघोज येथील तिरुपती इंजिनिअसिंग कंपनीमध्ये घडला आहे.

 

 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राहुल डेरे व शरद जगदाळे हे महावितरणचे पदाधिकारी आहे. त्यांनी कंपनीच्या वतीने ग्राहकांना मिटर बसविण्याचे काम दिलेल्या सिक्युअर एजन्सीचे पदाधिकारी यांच्या सोबत आणि निघोज गावातील तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीचे मालक व पदाधिकारी यांच्या संगनमत केले. तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीत २ लाख १९ हजार ५२४ विद्युत युनिट पुरविले. मात्र, त्याचे १८ लाख २७ हजार ३२० रुपयांचे बिल न आकारता महावितरण कंपनीची फसवणूक (Cheating) करुन शासनाचा महसुल बुडविला.

 

सिक्युअर एजन्सी या कंपनीला महावितरणने ग्राहकांना पुरविण्यासाठी नवीन २३ मिटर सोपविले होते.
३ लाख ३४ हजार ४०० रुपयांच्या या मिटरची माहिती महावितरणला न देता त्या मिटरचा अपहार केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Officials conspired with the agency and made a mess of Rs 20 lakh! Filed a case against four persons including two officers of MSEDCL

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Suspended | मृताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार उघडकीस; पोलिस अधिकार्‍याचे तडकाफडकी निलंबन

IAS Ankita Jain | पती IPS अधिकारी, आता पत्नी झाली IAS; UPSC परीक्षेत 2 वेळा नापास झाल्यानंतर असे मिळवले यश

Ajit Pawar | बारामती दौऱ्या दरम्यान अजित पवार भाऊक, हात जोडून म्हणाले…