Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) असलेल्या महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी (Road Crossing) मदत करण्याचा बहाणा करुन दोघा चोरट्यांनी (Thief) त्यांच्याकडील पिशवीतील पैशांचे पाकिटातील १ लाख रुपयांची सोन्याची कंठीमाळ नकळत काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी पौड रोडवरील शिला विहार कॉलनीत (Shila Vihar Colony) राहणार्‍या एका ६५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८६/२२) दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार पौड फाटा येथील दशभुजा गणपती मंदिराजवळ मंगळवारी दुपारी चार वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दशभुजा गणपती मंदिराजवळ रस्ता ओलांडण्यासाठी वाहने थांबण्याची वाट पहात थांबल्या होत्या.
त्यावेळी एकाने त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला.
त्यांचे साथीदाराचे मदतीने फिर्यादींना बोलण्यात गुंतविले. त्यांच्याकडील पिशवीतील पैशांचे पाकिट नकळत चोरुन नेले.
या पैशांच्या पाकिटामध्ये १ लाख रुपयांची सोन्याची कंठीमाळ व ५५० रुपयांची रोकड होती.
पोलीस उपनिरीक्षक सपताळे (Sub-Inspector of Police Saptale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा