Pune Crime | निलेश घायवळ टोळीतील एकाला मोक्का प्रकरणात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) (MCOCA Action) Mokka व खुनाचा प्रयत्न तसेच खंडणीसाठी (Ransom) मारहाण (Beating) केल्याप्रकरणात फरार असलेल्या निलेश घायवळ टोळीतील (Nilesh Ghaiwal Gang) एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या (Crime Branch Unit 3) पथकाने पुणे जिल्ह्यातील (Pune Crime ) मोरगाव (Morgaon) येथून अटक केली. गणेश सतीश राऊत Ganesh Satish Raut (वय-31 रा. ज्ञानेश्वर कॉलनी, डीपीरोड, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

गणेश राऊत याच्यावर पुण्यातील (Pune Crime) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, धमकावणे व हत्यार बाळगल्याप्रकरणी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यासाठी फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवारी (दि.8) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan), उपनिरीक्षक दत्तात्रय काळे (PSI Dattatraya Kale) व पोलीस अमंलदार आरोपीचा शोध घेत होते.

 

 

पोलीस शिपाई राकेश टेकावडे (Rakesh Tekawade) यांना कोथरुडच्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश राऊत हा मोरगाव येथील एसटीस्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने एसटी स्टँडजवळ सापळा रचून आरोपी गणेश राऊत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पुढील तपासासाठी कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश निंबाळकर,
संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, राकेश टेकावडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | One of Nilesh Ghaiwal gang arrested in Mocca case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा