Pune Crime | दागिने बनविण्यासाठी दिलेले 25 लाखाचे सोने घेऊन कारागीर पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याचे दागिने (Gold jewelry) बनवण्यासाठी दिलेले 25 लाखाचे सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) रविवार पेठेतील सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याच्या कारखान्यात घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) कारागीरावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पलास बादल जाना (वय-27 रा. गोपीनाथपुर, पुर्व मिदनापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारागिराचे नाव आहे. याप्रकरणी सचिनंदन धरणी पाल (वय-56 रा. रस्ता पेठ, हिरा हाईट, पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाल यांचा रविवार पेठेतील गुरुप्रसाद अपार्टमेंट मधील तिसरा मजल्यावर सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. आरोपी जाना हा फिर्यादी पाल यांच्या कारखान्यात कामगार (Factory worker) होता. तो त्यांच्याच कारखान्यात राहण्यास होता. फिर्यादी पाल यांनी आरोपी जानाला इतर सराफांकडून आणलेल्या 25 लाख 55 हजार 626 रुपये किमतीच्या 578 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी दागिने बनविण्यासाठी विश्वासाने दिल्या होत्या. परंतु आरोपीने सोन्याचे दागिने न बनवता ते सोने घेऊन 28 जुलै 2021 रोजी सायंकाळी पळून गेला. फिर्यादी यांनी त्याच्या मुळ गावी जाऊन शोध घेतला. परंतु तो त्याठिकाणी सापडला नसल्याने त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijeet Patil) करीत आहेत.

हे देखील वाचा

Narayan Rane | राणेंच्या अटकेचा आदेश नेमका कुणी दिला? CM ठाकरे, अजित पवार, आणि अनिल परब?

Crime News | भाजप नगरसेवकाकडून मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंधाची ऑफर, महिलेनं डायरेक्ट केलं ‘हे’ काम (व्हिडीओ)

Pune News | खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा TMC कमी पाणीसाठा
ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | One of the gang members with more than 15 charges of theft has been arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update