Pune Crime | पुण्यात घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्‍यांवर छापा; हडपसर परिसरातील सय्यदनगरमधील प्रकार उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घोड्याच्या शर्यतीवर बेटिंग (Online Betting On Horse Racing) घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला असून वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आतम अशोक बजाज Atam Ashok Bajaj (वय ४५, रा. लुल्लानगर – Lulla Nagar) आणि फिरोज रशिद पठाण Feroz Rashid Pathan (वय ३२ रा. हडपसर – Hadapsar) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याप्रकरणी पोलीस अंमलदार निळकंठ राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात Wanwadi Police Station (गु. रजि. नं. १४४/२२) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यदनगर (Sayyed Nagar, Pune) येथे घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेतले जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी अगोदर खात्री केली. त्यानंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सय्यदनगर येथील घरावर छापा घातला. यावेळी तेथे बजाज व पठाण हे घोड्याच्या शर्यतीवर मोबाईलद्वारे ऑनलाइृन सट्टा लावत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून मोबाईल व जुगारीचे साहित्य (Gambling Materials) असा १७ हजार ४३९ रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Online Betting On Horse racing In Sayyadnagar And Hadapsar Area Of Pune FIR On Atam Ashok Bajaj And Feroz Rashid Pathan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR