Pune Crime | 25 वर्षीय महिलेच्या पतीमध्ये लैंगिक कमतरता ! सासर्‍यानं डायरेक्टच केलं लज्जास्पद कृत्य, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | सासरच्या लोकांनी मुलामध्ये लैंगिक कमतरता असल्याचे लपवून ठेवत महिलेचा शारिरीक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार जून 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole Ahmednagar District) येथे घडला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीच्या पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे.

 

हडपसर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पती, सासरे, सासू आणि एका महिलेवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या लोकांनी पीडित महिलेच्या पतीमध्ये लैंगिक कमतरता असल्याची माहिती लपवून ठेवून वेळोवेळी शाररिक, मानसिक छळ केला. तसेच सासूकडे ठेवण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणूक (Pune Crime) केली.

 

पीडित महिला मोबाईल घेण्यासाठी गेल्या असता आरोपी सासऱ्यांनी त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या आई-वडिलांना घरात डांबून ठेऊन शिवीगाळ करत दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन चार जणांवर गुन्हा (molestation case) दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | physical deficiency in the husband of a 25-year-old woman! The father-in-law did the shameful act directly, the incident in Hadapsar area of ​​Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Diwali 2021 | दिवाळीत ग्रहांचा शुभयोग ! 4 राशीच्या जातकांना होईल ‘लाभ’, लक्ष्मीमातेची राहील विशेष कृपा

PM Modi | ना सुरक्षेची उपाययोजना, ना ट्रॅफिक थांबवली; दिल्लीच्या रस्त्यावर सामान्य माणसाप्रमाणे निघाले PM मोदी (व्हिडिओ)

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात करून किती मिळाला दिलासा? वाढीच्या तुलनेत किरकोळ आहे घसरण, जाणून घ्या पूर्ण गणित