Pune Crime | कात्रज-कोंढवा रोडवर पोलिसांची कारवाई ! गुन्हे शाखेकडून 4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotic Cell, Pune) एकने प्रतिबंधित गुटख्याची (Gutkha) वाहतूक करणाऱ्या तीन चाकी टेम्पोमधून चार लाखांचा गुटखा जप्त (Seized) केला. याप्रकरणी पोलिसांनी सहदेव रामचंद्र शिंदे (Sahadeva Ramchandra Shinde) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) आयपीसी 328, 188, 272, 273, सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (Cigarettes and Tobacco Products Act) कलम 7 (2) व 20 (2), अन्न सुरक्षा मानके अधिनियम (Food Safety Standards Act) 26 (2) (i) (iv) नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी (दि.18) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी इंडियन ऑईल पेट्रोलपंपा समोर कात्रज कोंढवा रोड (Katraj Kondhwa Road) येथे एक तिनचाकी टेम्पो संशयितरीत्या जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी टेम्पो थांबवून चालक सहदेव शिंदे (वय – 29 रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी रोड, पुणे) याला ताब्यात घेतले. (Pune Crime)

पोलिसांनी तिनचाकी टेम्पोची झडती घेतली असता शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ असा एकूण 4 लाख 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 2 लाख 50 हजार रुपये किमतीचा टेम्पो (एमएच 12 केपी 7850), 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल, दोन हजार रुपये रोख असा एकूण 6 लाख 74 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad), पोलीस अंमलदार पांडुरंग पवार, विशाल शिंदे, विशाल दळवी, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Police action on Katraj Kondhwa road 4 lakh banned gutka seized by Pune Police Crime Branch


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा