Pune Crime | वारजे माळवाडी परिसरातील 7 सराईत गुन्हेगारांविरूध्द ‘मोक्का’ कारवाई, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 70 वी मोक्का कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उगारला आहे. पुणे शहरातील सराईत गुन्हेगार आणि टोळी प्रमुख अक्षय रवींद्र खवळे (Akshay Ravindra Khawale) याच्यासह 7 सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील (Pune Crime) वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.

 

टोळी प्रमुख अक्षय रवींद्र खवळे (वय – 23 रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे), तुषार उर्फ एस्प्या लक्ष्मण शिंदे (वय – 21 रा. वारजे), राजू महादेव मारणे (वय – 22 रा. दत्तनगर, वारजे), सचिन कैलास हिरेमणी (वय – 19 रा. शिवाजी चौक, वारजे), निलेश विजय गायकवाड (वय – 24 रा. वारजे), अभिजीत उर्फ सिद्धराम रमेश मंजिली (रा. साई चौक, लक्ष्मीनगर, डहाणुकर कॉलनी, कोथरुड), नंदु आनंता जाधव (वय – 24 रा.कोथरुड), अक्षय उर्फ टिल्या गायकवाड (रा. कोथरुड) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा Maharashtra Organized Crime Control Act (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचे (Arm Act) गुन्हे दाखल आहेत.(Pune Crime)

 

आरोपी अक्षय रवींद्र खवळे आणि त्याच्या साथिदारांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात खुन करणे (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted murder), अपहरण (Kidnapping), जबरी दुखापत करून दरोडा, दरोडा (Robbery), दंगा, गंभीर दुखापत, कट तसेच लोकांच्या जिवास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणे, मारामारी असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच फरक पडला नाही.

गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke) यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्तांची 70 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालु वर्षात 7 तर आजपर्यंतची 70 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे (ACP Rukmini Glande)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक गुन्हे अमृत मराठे (Police Inspector Amrut Marathe),
पोलीस उपनिरीक्षक रायकर (PSI Ryker) पोलीस उपनिरीक्षक बागल, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe),
पोलीस अंमलदार सचिन कुदळे, अमोल भिसे, गोविंद फड, अमोल काटकर, अमोल राऊत, ज्ञानेश्वर गुजर,
नितीन कातुर्डे, रमेश चव्हाण, गोविंद कपाटे, अजय कामठे, विजय भुरुक, प्रियंका कोल्हे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta MCOCA Action Pune Criminals Warje Malwadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा