Pune Crime | 5 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक, कुटुंबातील चौघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मराठे ज्वेलर्सच्या (marathe jewellers) योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ठेवीदारांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात मराठे ज्वेलर्सच्या माजी भागीदाराला अटक (Pune Crime) कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) अटक केली आहे.

प्रणव मिलिंद मराठे Pranav Milind Marathe (वय 26, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तपासासाठी पोलिस ठाण्यात हजर होण्याबाबत वेळोवेळी नोटीश पाठवूनही हजर न झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी कौस्तुभ अरविंद मराठे Kaustubh Arvind Marathe (रा. कर्वेनगर), मंजिरी कौस्तुभ मराठे (Manjiri Kaustubh Marathe), नीना मिलिंद मराठे (Nina Milind Marathe) आणि इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल आहे. आत्महत्या केलेले मराठे ज्वेलर्सचे (marathe jewellers) मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे (Milind alias Balwant Arvind Marathe) यांच्यावर देखील याबाबत गुन्हा दाखल आहे.

शुभांगी विष्णू कुटे Shubhangi Vishnu Kute (वय 59, रा. शिवतीर्थ नगर, कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. प्रणव मराठे हा मराठे ज्वेलर्स या भागीदारी संस्थेत 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत भागीदार होता. सर्व गुंतवणुकदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या आयुष्यभराची कमाई गुंतवणूक म्हणून दिली आहे. आरोपीने गुंतवणूकदारांची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे तसेच व्यापारात सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत असल्याचे सहायक सरकारी वकील एम.बी वाडेकर (Assistant Public Prosecutor MB Wadekar) यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले.

18 गुंतवणुकदांना घातला गंडा
आरोपींनी प्रणव ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आदी गुंतवणूक करायला लावली तसेच फिर्यादींसह एकुण 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रूपयांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले आहे. याप्रकरणात 21 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल करण्याता आला आहे.

 

18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

आरोपीने वैयक्तिक तसेच संयुक्त बँक खात्याचा आवश्यक तपशील सादर केलेला नाही तो प्राप्त करायचा आहे.
तसेच ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत न करता त्याचा विनियोग कोणत्या
मालमत्ता खेरदी विक्री करण्यासाठी करण्यात आला याबाबत कागदपत्रे हस्तगत करणे व तपास करायचा आहे.
यासह इतर तपास करण्यााठी त्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी वाडेकर यांनी केली.
न्यायालयाने ती मान्य केली. विशेष न्यायाधिश एस. एस. गोसावी (Special Judge S. S. Gosavi)
यांनी त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title :- Pune Crime | Pranav Marathe of Maratha Jewelers arrested in Rs 5 crore fraud case, crime against four members of the family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | पीपीपी तत्वावर रस्ते व उड्डाणपुलांची उभारणी ! ‘आर्थिक अटीशर्तीं’मुळे बड्या बांधकाम व्यावसायिकांनी ठेकेदारांना केले पुढे; विकासाच्या गोंडस नावाखाली पुणेकरांवर ‘दरोडा’

Attack on Police | धक्कादायक ! 2 गटातील भांडणं सोडवताना जमाव बिथरला, पोलिसांवरच केला तलवारीने हल्ला

OMG ! मुल रडत असल्याने त्रस्त महिलेनं उचललं भयंकर पाऊल, ओठांवर फेव्हिक्विक लावून चिकटवले तोंड