Pune Crime | पुण्यातील गुन्हेगार दिनानाथ उर्फ सोन्या पवार व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 89 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 89 टोळ्याविरुद्ध कारवाई करुन गुन्हेगारांची रवानगी कारागृहात केली आहे. पुण्यातील (Pune Crime) कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार दिनानाथ उर्फ सोन्या गोरक्षनाथ पवार (Dinanath alias Sonya Gorakshanath Pawar) व त्याच्या टोळीवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 89 आणि चालु वर्षात 26 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

टोळी प्रमुख दिनानाथ उर्फ सोन्या गोरक्षनाथ पवार (वय 22 रा. शास्त्रीनगर, कोथरुड) व त्याचे साथीदार आणि कोथरुड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय उर्फ ज्वाला शांताराम येवले (वय-23 रा. सुतारदरा, कोथरुड), प्रदीप उर्फ पद्या भोला मिर्धा (वय-19 रा. सूसगाव, ता. मुळशी) आणि एक विधीसंघर्षीत बालक यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

आरोपी दिनानाथ उर्फ सोन्या पवार आणि त्याच्या 3 साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी पुणे शहर (Pune Crime) व परिसरात दहशत निर्माण केली आहे. या टोळीने खुनाचा प्रयत्न (Attempted Murde), गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र द्वारे जमखी करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न (Robbery), जाळपोळ, हत्यारांचा धाक दाखणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत.

आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांच्यात सुधारणा झाली नाही.
आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap)
यांनी पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (Kothrud Division ACP Rukmini Galande) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड,
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप,
पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बडे (Police Inspector Balasaheb Bade), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे (PSI Digambar Kokate),
पोलीस अंमलदार भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune criminal Dinanath alias Sonya Pawar and his gang booked under mokka, 89th mcoca action of Commissioner Amitabh Gupta till date

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yogasana For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज करावी ही 2 योगासन

 

Deepak Kesarkar | केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘जरा आपल्या…’

 

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एयरमध्ये (Akasa Air) फ्लाईट बुकिंग सुरू, पहिले उड्डाण 7 ऑगस्टला होणार