Pune Crime | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) लिपिक (Clerk) पदावर नोकरी (Job) लावण्याचे आमिष दाखवून साडेसतरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीने दोन महिलांसह चौघांची (Pune Crime) साडेसतरा लाखांची फसवणूक (Cheating) केली आहे.
या प्रकरणी संतोष शांतीलाल वाल्हेकर Santosh Shantilal Walhekar (रा. ताडीवाला रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभांगी भिकाराम पोटे Shubhangi Bhikaram Pote (वय 36, रा. वाघोली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वाल्हेकर याच्याशी पोटे यांची ओळख झाली होती. वाल्हेकरने पोटे, त्यांची भावजय सईंद्रा वाजे (Saindra Waje) तसेच परिचित रोहन जाधव (Rohan Jadhav) आणि आकाश गायकवाड (Akash Gaikwad) यांना पुणे महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. वाल्हेकर याने त्यांच्याकडून साडेसतरा लाख रुपये घेतले होते. (Pune Crime)
पैसे घेतल्यानंतर वाल्हेकरकडे त्यांनी नोकरी बाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोटे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गुरव (PSI Gurav) तपास करत आहेत.