Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार श्रीगणेश उर्फ शिऱ्या वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 91 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 91 टोळ्याविरुद्ध कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune Crime) उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार श्रीगणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (Shree Ganesh alias Shireya Waghmare) व त्याच्या टोळीतील 5 जणांवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 91 आणि चालु वर्षात 28 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

टोळी प्रमुख श्रीगणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय-21 पा, राहुलनगर शिवणे, पुणे), सचिन शंकर दळवी (वय-23, रा. वारजे), सुरज राजु मारुडा (वय-21 रा. वारजे पोलीस चौकीच्या मागे, वारजे), रखमाजी परमेश्वर जाधव (वय-19 रा. वारजे माळवाडी), प्रतिक संजय नलावडे (वय-21 रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी), समीर उर्प अरब्या नरहरी कांबळे (वय-18 रा. कोंढवे धावडे, उत्तमनगर) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपींनी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी वारजे (Warje), उत्तमनगर परिसरात दहशत निर्माण केली आहे.

 

शेऱ्या वाघमारे व त्याच्या साथीदारांनी उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत:चे तसेच टोळीचे वर्चस्व व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी (Theft), मारामारी, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही.(Pune Crime)

आरोपींवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar)
यांनी परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Poornima Gaikwad)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रुक्मीणी गलांडे (ACP Rukmini Galande) करीत आहेत.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड,
कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रुक्मीणी गलांडे यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे अर्जुन बोत्रे (Police Inspector Arjun Botre)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar)
पोलीस अंमलदार नांगरे, वारुळे, हजारे, पवार, खाडे, गायकवाड यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 91st MCOCA action till date against Pune criminals; Shriganesh alias Shirya Waghmare and his gang booked under mokka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Sanjay Raut | फडणवीसांकडून ‘लाउडस्पीकर’ असा उल्लेख; संजय राऊत म्हणाले – ‘काय पिपाण्या, सनई चौघडे….’

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…