पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping Case) करणार्या कुख्यात गुंड गज्या मारणेच्या (Gajanan Marne) मुसक्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 नं आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) त्याला सातारा जिल्ह्यातील वाईमधून (Wai Satara District) ताब्यात घेतले आहे. यापुर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या अपहरण प्रकरणात चंदगडमधील डॉक्टर डॉनला मध्यप्रदेशातील इंदूर (Indur MP) येथून अटक केली होती. (Pune Crime)
गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare) आणि कर्मचार्यांनी ताब्यात घेतले आहे.
गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण केले होते. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यात या व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर तपासात प्रकाश बांदिवडेकर यानेही धमकाविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने इंदूरमधून त्याला ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्यात १४ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश बांदिवडेकर हा १५ आरोपी आहे.
खंडणी प्रकरणात सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय ३९,रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर,कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा.नर्हे), नितीन पगारे (रा.सातारा), प्रसाद खंडागळे (रा.तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne),
पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav),
श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके,
अनिल मेंगडे, सचिन गायकवाड, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे,
चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले, अकबर शेख पवन भोसले,
रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गजानन मारणे हा अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्या वाई येथील फार्म हाऊसवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेला होता. तेथून पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक-2 नं गज्या मारणेला ताब्यात घेतलं आहे.
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti-Extortion Cell – 2
Detain Gangster Gajanan Marne From Wai Of Satara district
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | मुंढव्यात तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, सहा ते आठजणांविरूद्ध गुन्हा
- Maharashtra BJP | अट्टल गुन्हेगाराचा भाजपात थाटात प्रवेश, हत्येसह 11 गंभीर गुन्हे, सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत!
- Pune Crime | दिवसाढवळ्या पीएमपीएल बस चोरीचा केला प्रयत्न, दोघांना अटक