Maharashtra BJP | अट्टल गुन्हेगाराचा भाजपात थाटात प्रवेश, हत्येसह 11 गंभीर गुन्हे, सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत!

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ईडी (ED) किंवा तत्सम चौकशी टाळण्यासाठी अनेक लोक भाजपामध्ये (Maharashtra BJP) प्रवेश करतात. भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन आहे, असे आरोप विरोधक सतत करत असतात. याचा अनुभव पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये हत्या (Murder)-दंगलीच्या (Riot) गुन्ह्यातील (Criminal) माजी नगरसेवकाने भाजपात (Maharashtra BJP) थाटात आणि धुमधडाक्यात प्रवेश केला. कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या माजी नगरसेवकाचे पक्षात स्वागत केले.

 

हत्येसह 11 गुन्हे असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश (Maharashtra BJP) केल्यामुळे चंद्रपूर शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. या अपक्ष माजी नगरसेवकाचे नाव अजय सरकार (Ajay Sarkar) असे आहे. शनिवारी रात्री शहरातील बंगाली कॅम्प भागात वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

 

धुमधडाक्यात आणि थाटात पार पडलेल्या या सोहळ्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. हत्या-दंगलीसारखे गुन्हे या माजी नगरसेवकावर दाखल आहेत.
मागील पाच वर्षापासून चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता असून महिनाभरात होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.

 

परंतु हत्येच्या गुन्ह्यासह अकरा गुन्हे (FIR) दाखल असलेल्या अजय सरकार याच्या भाजप प्रवेशाने सर्वांनाचा धक्का बसला आहे.
बंगाली कॅम्प भागात अजय सरकारचा प्रभाव आहे. मागील वर्षभरात गँगवॉर सदृश्य अनेक प्रकरणात अजय सरकार याचा सहभाग उघड झाला आहे.

 

Web Title :- Maharashtra BJP | 11 serious crimes including murder ajay sarkar ex corporator joins bjp in presence of sudhir mungantiwar