Pune Crime | गांजाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला गुन्हे शाखेकडून अटक, 23 किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात गांजाची (Marijuana) विक्री करण्यासाठी येणाऱ्या युवकाला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 23 किलो 666 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 13) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील केसनंद फाट्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर (Pune Crime) करण्यात आली.

 

सूरज कांतिलाल बोरा Suraj Kantilal Bora (वय – 33 रा. सवेंद्र कॉम्पलेक्स, केसनंद फाटा, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट (N. D. P. S. Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad) हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी लोणीकंद येथे एक जण अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने केसनंद फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ 23 किलो 666 ग्रॅम गांजा आढळून आला. आरोपींकडून 4 लाख 73 हजार 120 रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale),
पोलीस अंमलदार देशपांडे, रोकडे, मयुर सुर्यवंशी, बोमादंडी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख,
योगेश मांढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, महिला पोलीस अंमलदार खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests youth for trying to sell cannabis seizes 23 kg of cannabis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा