Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) (MCOCA Action) Mokka गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली. शंभु उर्फ राम बालाजी कावळे Shambhu alias Ram Balaji Kawale (रा. सुधाकर निवास, साठे वस्ती, लोहगाव मुळ रा. कावळेवाडी, ता.जि. उस्मानाबाद-Osmanabad) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या (Pune Crime) आरोपीचे नाव आहे.

 

राम कावळे याच्यावर पुण्यातील (Pune Crime) विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल आहे. आरोपीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाई झाल्यापासून आरोपी आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. आरोपी राम कावळे हा स्वारगेट (Swargate) परिसरात येणार असल्याची माहिती युनिच 4 च्या पथकाला मिळाली. त्यानुसार आरोपीला सापळा रचुन जेधे पुलाजवळील (Jedhe Bridge) कॅनल रोडवर ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरुन आणि विमानतळ पोलिसांकडे केलेल्या चौकशीत आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (Yerwada Division ACP) यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar), पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil), सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस हवालदार राजस शेख, पोलीस नाईक संजय आढारी, स्वप्नील कांबळे, प्रविण भालचिम, पोलीस अंमलदार रमेश राठोड, वैशली माकडी, चालक पोलीस हवालदार शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Criminal Who Abscond in MCOCA

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात ‘कोरोना’ची दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत, आज 2521 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Malaika Arora Party Look | काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून पार्टीमध्ये पोहोचली मलाइका अरोरा; फोटोनं इंन्टाग्रामवर घातला धुमाकूळ..

 

Uddhav Thackeray | ‘मी पुन्हा येणार म्हणून न येणं हे खूप वाईट’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा