Pune Crime | पुण्यातील न्यायालयात बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटवर गुन्हे शाखेची ‘धाड’; सात जणांना अटक

पुणे : Pune Crime | गुन्हे शाखेने गेल्या वर्षी गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटचा भांडाफोड केला होता़ आता पुन्हा एकदा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर (Shivajinagar Court) कारवाई करुन गुन्हेगारांना बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या ७ जणांना अटक (Pune Crime) केली आहे. ,

गोपाळ पुंडलिक कांगणे (वय ३३, रा. मोरवाडी, पिंपरी), सागर अनंत काटे (वय २५, रा. पिंपळे गुरव), दिनकर सुंदर कांबळे (वय ३८, रा. आनंदनगर, चिंचवड), हसन हाजी शेख (वय २५, रा. पिंपळे गुरव), रोहित विद्यासागर पुटगे (वय २४), किरण दादाभाऊ सूर्यवंशी (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय रवी वाघमारे (वय २९), विजय भास्कर, राकेश परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट ५ चे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेडगे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या बनावट जामीनदार प्रकरणात सुमारे ३० जणांना अटक केली होती. त्यातील काही आरोपी या प्रकरणात पुन्हा अशाच प्रकारे बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देताना आढळून आले आहेत.

Pune News | ACP सुषमा चव्हाण यांचे पती शैलेंद्र चव्हाण यांचं निधन

शिवाजीनगर न्यायालय, तसेच लष्कर (Lashkar Court), पिंपरी (Pimpri Court), मोरवाडी (Morwadi Court) व
इतर न्यायालयात जबरी चोरी, दरोडा, पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जमाीन करुन
देण्यासाठी यांनी बनावट आधार कार्ड (Fake Aadhaar Card), रेशन कार्ड (Fake Ration Card), ७/१२ उतारा व खोटे
शिक्के वगैरे तयार करुन खोटे शासकीय दस्तऐवज (Government Documents) तयार केले.
ज्या आरोपींना जामीनदार नसतो. तसेच काही आरोपी जामीनावर सुटल्यानंतरही पुन्हा कोर्ट कामासाठी हजर राहत
नाही अशा आरोपींना जामीन देण्यासाठी एजंटमार्फत बोगस जामीनदार तयार करतात.
खोटे दस्तऐवज तयार करुन न्यायालयात ते खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल केली जाते़,
याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने गुरुवारी सकाळी शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील रोडवर धाड टाकून ७ जणांना (Pune Crime) पकडले.

त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, बनावट ७/१२ उतारे जप्त केले आहेत.
या आरोपींनी कोणाकोणाला आतापर्यंत जामीन (Pune Crime) राहिले याची माहिती घेतली जात आहे.

हे देखील वाचा

India’s GDP | भारताच्या GDP मध्ये 2050 पर्यंत होईल 406 अरब डॉलरची वाढ, 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळेल नोकरी; जाणून घ्या

Youtube | यूट्यूब व्हिडिओवर आता डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Pune Police Crime Branch ‘raid’ on a racket in a Pune court seeking bail through forged Government documents; Seven arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update