Pune Crime | वारजे माळवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 21 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 22 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 21 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोकड, जुगाराचे साहित्य असा एकूण 33 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वारजे माळवाडी परिसरात बेकायदेशीर मटका, जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला (Pune Crime) मिळाली होती.

सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई मंगळवारी (दि.13) केली. वारजे माळवाडी येथील रामनगर मधील सचिन बोडके (Sachin Bodke) यांच्या पडीक इमारतीच्या मोकळ्या पार्किंगच्या जागेत काहीजण पत्त्यांचा जुगार पैशावर खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाळत ठेऊन जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
त्यावेळी 21 जण मटका, सोरट, चक्री खेळत असल्याचे आढळून आले.
त्यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी ताब्यातील 21 आणि फरार मटका अड्ड्याचा मालक असे एकूण 22 जणांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांना वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime)

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे

सचिन सुधिर खराडे (वय-32 रा. कॅनोल रोड, वारजे माळवाडी), मनोहर शंकर कांबळे (वय-50 रा. शिवणे, पुणे),
हणुमंत बापु तोडणकर (वय-62 रा. नऱ्हे, पुणे), विजय दामोदर बोबडे (वय-39 रा. धनकवडी),
दिपक वासुदेव कृष्णाजी (वय-40 रा. पुणे स्टेशन), देवेंद्र तेज सिंग (वय-39 रा. दत्तनगर, वारजे),
धिरज बिभीषण माने (वय-22 रा. रामनगर, वारजे माळवाडी), बालाजी बन्सी भडके (वय-40 रा. रामनगर,
वारजे माळवाडी), महादेव प्रकाश टाके (वय-39 रा. वारजे माळवाडी), भरत नामेदव पडळदरे (वय-60 रा. शिवणे),
सुनिल महादेव केतम (वय-48 रा. सिंहगड रोड), नितीन दत्तराव साबळे (वय-24 रा. नऱ्हेगाव, पुणे), एकनाथ विष्णु नानगुळे (वय-31 रा. शिवाजी चौक, वारजे माळवाडी), मेहबब अजीज पठाणे (वय-32 रा. सुरक्ष कॉलनी, वारजे माळवाडी), अविनाश दिलीप हुलसुरे (वय-32 रा. कर्वेनगर, पुणे), दशरथ जगन्नाथ गायकवाड (वय-47 रा. रामनगर), मोतीलाल बबन राठोड (वय-33 रा. रामनगर), अमित सर्जेराव खंडाळकर (वय-30 रा. सुतारदरा, कोथरुड), विशाल गोप अहुजा (वय-45 रा. साई चौक, पिंपरी), विठ्ठल मारुती शेलार (वय-62 रा. गोसावी वस्ती, रामनगर), आप्पा शंकर वटार (वय-40 रा. सिद्धार्थ चौक, रामनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर जुगार अड्ड्याचा मालक नितीन सपकाळ (रा. गणेशपुरी, वारजे माळवाडी) याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस
निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके
(PSI Shridhar Khadke), सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,
बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, पुष्णेंद्र चव्हाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे
यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch raided a gambling den in Warje Malwadi, 21 people were detained

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vitamin B12 | ‘या’ 5 संकेतांवरून जाणून घ्या शरीरात झाली आहे व्हिटॅमिन B-12 ची मोठी कमतरता, काम करणे बंद करतील अनेक अवयव

Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! भारती विद्यापीठ, खडक, समर्थ आणि सिंहगड रोड पो.स्टे. मध्ये नियुक्त्या

NEMS School Pune | आजी आजोबांनी निभावली परीक्षकांची भूमिका; एनईएमएस शाळेचा अनोखा उपक्रम