Pune Crime | पुण्यात 96 लाखांची फसवणूक करणार्‍या व्यावसायिक गणेश केंजळे व महेश केंजळेंना अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जुना 8 अ चा उतारा दाखवून त्याद्वारे स्वत:ची जमीन खरेदी दाखवून उद्योजकाला (Entrepreneur in Pune) व्रिकी करुन 96 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी पुण्यात दोघा व्यावसायिकाविरुद्ध ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing, Pune Rural) अटक केली (Pune Crime) आहे. गणेश रामराव केंजळे (Ganesh Ramrao Kenjale) आणि महेश रामराव केंजळे Mahesh Ramrao Kenjale (रा. साकेत सोसायटी, शिवतिर्थनगर, पौड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने (Court) त्यांना अधिक तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody Remand) सुनावली आहे. याप्रकरणी उद्योजक मिलींद महाजन Entrepreneur Milind Mahajan (वय ५८, रा. पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद महाजन हे उद्योजक असून त्यांचा भोसरीत लघु उद्योग (Small Scale Industry In Bhosari) आहे. महाजन यांनी 2011 मध्ये एका मध्यस्थामार्फत गणेश केंजळे (Ganesh Kenjale) व महेश केंजळे (Mahesh Kenjale) यांची एरंडवणा (Erandwane) येथील शिलाविहार कॉलनीतील कार्यालयात भेट घेतली. एप्रिल 2011 मध्ये गणेश केंजळे व महेश केंजळे यांच्याकडून मुळशी (Mulshi) तालुक्यातील भूकूम (Bhukum Pune) येथील गट नं. 306 क्षेत्र 25 आर जागा रजिस्टर खरेदी खताने विकत घेतली. त्याचा व्यवहार 85 लाख रुपयात ठरला. खरेदी खतात ठरल्याप्रमाणे त्यांनी एक महिन्याच्या आत 7/12 उतार्‍यावर त्यांचे नाव लावून दिले नाही.

 

केंजळे यांनी माझीरे यांच्याकडून 25 आर जागा खरेदी घेतली व ती जागा फिर्यादी यांना विकली होती. त्या जागेवर क्षेत्र शिल्लक नाही, म्हणून एकनाथ मारुती माझीरे (Eknath Maruti Mazire) यांनी हरकत (Objection) घेतली होती. त्यावेळी केंजळे यांनी आम्ही एकनाथ माझीरे यांच्याकडून त्यांचे हिश्शाची 40 आर जागा खरेदी घेणार असून त्यातील 25 आर क्लिअल टायटल जागा तुम्हाला देऊन बदली दस्त करुन देऊ असे सांगितले. (Pune Crime)

त्यानंतर फिर्यादी यांना आजारपणासाठी पैसे लागत असल्याने त्यांनी केंजळे यांना ती जागा विक्री करायची असल्याचे सांगितले. परंतु, त्यांच्या नावावर 7 /12 उतारा नसल्याने विक्री करता येत नव्हती. तेव्हा केंजळे यांनी 40 आर जागा खरेदी केली असून ती सलग एका ग्राहकाला विकू असे सांगितले. त्यानंतर केंजळे बंधु यांनी ग्राहक पाहिले. त्यांनी फिर्यादी यांना तुमचे 7/12 उतार्‍यावर नाव आहे. परंतु त्यावर तुमचे नावासमोर क्षेत्र शुन्य शुन्य दाखवत आहे. यावरुन तुमचे नावाने क्षेत्र शिल्लक नाही, असे दिसून येत असल्याचे सांगितले. तेव्हा केंजळे यांनी महसूल विभागाकडून (Revenue Department Pune) काही तरी तांत्रिक चूक झालेली आहे. ती मी दुरुस्त करुन घेतलो, असे सांगितले. त्यानंतर त्यांना तहसिलदारांच्या नावाने अर्ज करायला सांगितला. एजंटने त्यांची जागेस 700 रुपये प्रति स्क्वेअर फुट दराने ग्राहक तयार करुन वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केली.

 

गट नं. 306 मध्ये एकूण जागेचे क्षेत्र 3 हेक्टर 58 आर असून प्रत्यक्ष जागेची विक्री 4 हेक्टर 11 आर झालेली आहे.
त्यामुळे अर्जदार यांचे नाव 7/12 उतार्‍यावर लावणेबाबत पूनर्विलोकनात घेऊन फेरबदल करणे आवश्यक असल्याचा अहवाल तलाठी यांनी दिली.
त्यानुसार तहसिलदार यांनी निकाल दिला.

केंजळे बंधु यांनी भिकू माझीरे (Bhiku Mazhire) व रामदास माझीरे (Ramdas Mazhire)
यांच्याकडून गट नं. 306 मधील प्रत्येकी 12.5.५ आर अशी एकूण 25 आर जागा खरेदी दाखवून
त्याचे फेरफारद्वारे स्वत:चे नावाचा 7 /12 उतारा तयार करुन घेऊन
ती जमीन फिर्यादी यांना विकून त्या जागेचा त्यांचा फेरफार 7/12 उतार्‍यावरील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री झाल्याने रद्द करण्यात आला.
त्यामुळे गणेश केंजळे व महेश केंजळे यांनी शिल्लक क्षेत्र नसतानाही खरेदीसाठी 85 लाख रुपये घेऊन
तसेच खरेदी खतापोटी घेतलेले पैसे, स्टॅम्प ड्युटी, वकील फी इत्यादी
मिळून एकूण 96 लाख 15 हजार 940 रुपयांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशी माहिती पुणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील (Pune Rural EoW) पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे (Police Inspector Rajkumar Kendre) यांनी दिली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune rural police Economic Offences Wing arrested Ganesh Kenjale and Mahesh Kenjale in Pune for cheating Rs 96 lakh; Two days in police custody

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात 25 वर्षीय वहिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ केला सावत्र दीरानं शूट, त्यानंतर धमकी देऊन बलात्कार; हिंजवडी परिसरातील घटना

 

Pune Crime | धक्कादायक ! मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर वारंवार बलात्कार

 

Corona in Mumbai | दिलासादायक ! मुंबईत ‘कोरोना’ची लाट ओसरतेय ?, आठवड्याभरात चित्र बदललं