Advt.

Pune Crime | धक्कादायक ! मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर वारंवार बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलीला ठार मारण्याची धमकी (Threat) देऊन महिलेवर वारंवार बलात्कार (Rape in Pune) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. हा प्रकार 2018 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे.

 

वसंत बबन भोगसे Vasant Baban Bhogse (वय-42 रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन (Husband Death) झाले आहे. त्यानंतर पीडित महिला तिच्या मुलीसह राहत असताना आरोपीची तिच्यासोबत ओळख झाली. या ओळखीतून आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. (Pune Crime)

 

पीडीत महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने त्यांच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद शिपणे (PSI Sharad Shipne) करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | rape woman threatening kill girl talegaon dabhade of Pune crime news molestation Case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा