Pune Crime | मैत्रिणीवरुन आंबेगावात दोन गटात राडा ! कोयत्याने एकमेकांवर केले हल्ले, पोलिसांनी केली 11 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका मुलीशी असलेल्या मैत्रीवरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरुन आंबेगाव खुर्द (Ambegaon Khurd) येथे दोन गटातील तरुणांनी एकमेकांवर कोयत्याने हल्ले (Attempt To Kill) करुन परिसरात दहशत पसरविली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केलेल्याचे २ गुन्हे दाखल करुन दोन्ही गटातील ११ जणांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत विशाल बालाजी सोमवंशी (वय २१, रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदेश धनाजी शिळीमकर, अमित थोपटे, अक्षय शिळीमकर, गणेश दसवडकर, स्वप्निल घारे, निखील कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) सांगितले की, फिर्यादीचा भाऊ विनोद सोमवंशी व आदेश शिळीमकर यांच्यामध्ये त्यांच्या मैत्रिणीवरुन भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन ते भांडण मिटविण्यासाठी आरोपींनी रविवारी रात्री फिर्यादी व त्यांच्या भावाला हनुमाननगरमधील शिवशाही चौकात बोलावले होते. तेथे अमित थोपटे याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. आदेश शिळीमकर याने कोयत्याने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. (Pune Crime)

याविरोधात आदेश धनाजी शिळीमकर (वय २३, रा. वेताळनगर, आंबेगाव) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०६/२२) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी विनोद बालाजी सोमवंशी, विशाल सोमवंशी, आकाश उणेचा, सजित पवार, पृथ्वीराज कांबळे, गोविंद लोखंडे, राम वाडेकर, योगेश थोरात, आकाश कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश उणेचा आणि सजित पवार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यासह पृथ्वीराज कांबळे, योगेश थोरात, आकाश कांबळे यांना अटक केली आहे.

 

फिर्यादी आदेश शिळीमकर व विनोद सोमवंशी यांच्यामध्ये एका मुलीवरुन वादावादी झाली होती.
ती मिटविण्यासाठी अमित थोपटे याने विनोद सोमवंशी याला बोलविले होते.
त्यावेळी विनोद सोमवंशी हा त्यांच्या साथीदारांना घेऊन शिवशाही चौकात आला.
त्यांनी फिर्यादीच्या गल्लीमध्ये आरडा ओरडा करुन कोयते दाखवून तेथील दुकानाच्या शटरवर कोयत्यांनी मारुन परिसरात दहशत निर्माण केली.
फिर्यादींना ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.
तो वार फिर्यादीच्या पायावर लागून तो गंभीर जखमी झाला. तसेच फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. फिर्यादीचा मित्र स्वप्निल घारे हा फिर्यादीला सोडविण्यासाठी आला असताना विनोद सोमवंशी हा त्याच्या हाताचे बगलेच्या ठिकाणी चावून त्याला जखमी केले. तेथील एक टेम्पो व दुचाकीचे नुकसान करुन दहशत पसरविली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त सागर पाटील व अन्य पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Rada in two groups in Ambegaon from girlfriend Coyote attacks on each other police arrest 11 people

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा