कंपनीच्या वॉशरुममध्ये ऑफिसबॉय कडून महिलांचे ‘चित्रण’ करणाऱ्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाणेरमधील एका कंपनीत वॉशरुममधील पीओपी टाईल्समधील फटीत मोबाईल ठेवून त्यावर महिलांचे चित्रण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ऑफिसबॉय विकास अंकुशराव घाडगे (रा़ मानधंनी जि़ परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका ४७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. या महिला त्यांचे प्रेशंट टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या बाणेर येथील युनिटमधील वॉशरुमध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. त्यांनी वॉशरुममध्ये पाहिले तेव्हा वरीज बाजूस असणाऱ्या पीओपी टाईल्समधील फटीत त्यांना एका काळ्या रंगाचा मोबाईल आढळून आला.

कंपनीतील ऑफिसबॉय विकास घाडगे याने  तो ठेवून वॉशरुममध्ये येणाऱ्या  महिलांचे एकांतातील कृतीचे चोरुन शुटींग करताना आढळून आला. हिंजवडी पोलिसांनी विकास घाडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
You might also like