Pune Crime | साहेबांना मुलगा झालाय…जेष्ठ महिलेला गंडवून दीड लाखांचे दागिने केले लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आमच्या साहेबांना मुलगा झाला असून ते गरिबांना पैसे वाटत आहेत. तुम्ही आमच्यासोबत चला, असे म्हणत दोघाजणांनी जेष्ठ महिलेला बाजूला नेले. त्यांच्याकडील दीड लाखांचे दागिने (Jewelry) ताब्यात घेउन बनावट दागिने देउन फसवणूक (Fraud) केली  आहे. ही घटना (Pune Crime) 15 ऑक्टोबरला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) कुदळे बाग इमारतीसमोर घडली.

याप्रकरणी 80 वर्षीय महिलेने सिंहगड पोलिस ठाण्यात (Sinhagad Police Station) तक्रार दिली आहे.(Pune Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास रस्त्याने पायी निघाल्या होत्या. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांना थांबवून आमच्या साहेबांना मुलगा झाला आहे. तुम्ही आमच्यासोबत चला, तुम्हालाही पैसे मिळवून देतो, अशी बतावणी करून रस्त्याच्या बाजूला नेले.

त्याठिकाणी चोरट्यांनी महिलेला तुमच्याकडील दागिने रुमालात ठेवा, नाहीतर दागिन्यांमुळे साहेब तुम्हाला पैसे देणार नाही. असे सांगून महिलेकडील दीड लाखांचे दागिने रूमालात ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेची नजर चुकवून तिच्याकडे बनावट दागिने ठेवलेला रूमाल ताब्यात देउन पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) तपास करीत आहेत.

दिवाळी आलीय सावधानता बाळगा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी अनेक महिला घराबाहेर पडतात.
नेमकी संधी साधून चोरट्यांकडून जेष्ठ महिलांना लक्ष्य करून लुट करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी खरेदीला जाण्यापुर्वी दागदागिन्यांचा मोह टाळण्याचे आवाहन पोलिसांनी (Pune Police) केले आहे.
त्याशिवाय जेष्ठ नागरिकांना एकट्याला घराबाहेर न पाठविण्याचे आवाहन केले आहे.

Web Title :- Pune Crime | Saheb has got a son… An elderly woman was cheated and made jewels worth one and a half lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा