Pune Crime | शिरुरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेल चालक, मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका

पुणे : Pune Crime | शिरुर तालुक्यातील (shirur) लॉजवर ग्रामीण पोलीस दलातील भरोसा सेलच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड (Pune Crime) केले आहे.  महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेणार्‍या हॉटेलचालक व मॅनेजरला अटक करुन तीन महिलांची सुटका केली आहे.

ओम साई लॉजचा चालक पारस बस्तीमल परमार आणि मॅनेजर शिवकांत सत्यदेव कश्यप (दोघे रा. ओम साई लॉज, सरदवाडी, ता. शिरुर) अशी या दोघांची नावे आहेत. शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे ओम साई हॉटेल लॉज येथील मॅनेजर व लॉजचालक हे महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली.

त्यांनी महिला भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख यांना कारवाई करण्यास
सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी ओम साई लॉजवर एक बनावट ग्राहक पाठविला. बनावट ग्राहकाने
इशारा केल्यानंतर पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकून मॅनेजर व चालकाला ताब्यात घेऊन तेथे
वेश्या व्यवसाय करणार्‍या तीन महिलांची सुटका केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख, सहायक फौजदार शब्बीर पठाण, तुषार पंधारे, हवालदार सचिन घाडगे, जनार्धन शेळके, राजु मोमीन, मुकेश कदम पोलीस अंमलदार मंगेश थिगळे, अजित भुजबळ, पूनम गुंड  यांनी केली आहे.

हे देखील वाचा

Navi Mumbai Crime | धक्कादायक ! नवी मुंबईत कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या; आत्महत्या केल्याचे 15 वर्षाच्या मुलीने भासवले

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील कचरा व्यवस्थापन पालिकेपुढील ‘आव्हान’; ‘पर्याय’ सुचविण्याचे ‘आवाहन’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Scandal of prostitution in shirur Hotelier, manager arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update