Pune Crime | HDFC बँकेत अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 12 लाखांची फसवणूक, 2 महिलांसह तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) अधिकारी असल्याचे सांगून बँकेच्या स्किम (Bank Scheme) मध्ये पैसे गुंतवल्यास (Investment Schemes) वार्षीक चाळीस टक्के परतावा देण्याचे आमिष एका व्यक्तीला दाखवले. त्याच्याकडून 12 लाख 20 हजार 300 रुपये घेऊन कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2017 ते मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.

 

याबाबत सारंग गोविंद काटेकर Sarang Govind Katekar (वय – 54 रा. 34 व्हायोला को. ऑप. सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ज्योती गिरीश मेंधे (Jyoti Girish Mendhe), कल्याणी आदिश काटकर (Kalyani Adish Katkar), सचिन च्युते Sachin Chute (सर्व रा. 34 व्हायोला को. ऑप. सोसायटी, वारजे) यांच्यावर 406, 420, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मेंधे या महिलेने फिर्यादी यांना आपण एचडीएफसी बँकेमध्ये वित्तीय विभागात (Financial Department) अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच सारंग काटेकर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी एचडीएफसी बँकेचा लोगो असलेले ओळखपत्र (ID Card) दाखवले. फिर्यादी यांना बँकेच्या स्किम मध्ये गुंतवणूक केल्यास 40 टक्के वार्षीक रिटर्न देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपी ज्योती मेंधे हिच्यावर विश्वास ठेवून 12 लाख 20 हजार 300 रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपींनी फिर्यादी यांना परतावा न देता त्यांच्या पैशांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वारजे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Senior citizen cheated Rs 12 lakh by claiming to be an officer in HDFC Bank FIR against three including 2 women

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा