Pune Crime | सेक्सटॉर्शन : ऑनलाईन ब्लॅकमेल करुन खंडणी मागणाऱ्या मास्टरमाईंडच्या पुणे पोलिसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | न्यूड फोटोवरुन (Nude Photos) ब्लॅकमेल करुन खंडणी (Extortion) उकळण्याचा प्रकार घडल्यानंतर पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका 19 वर्षाच्या तरुणाने दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. हा प्रकार 29 सप्टेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला होता. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने (Cyber Police) या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन सेक्सटॉर्शन (Sextortion) गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराच्या राजस्थान (Rajasthan) येथून मुसक्या आवळल्या आहेत.

अन्वर सुबान खान Anwar Suban Khan (वय-29 रा. गुरुगोठडी ता. लक्ष्मनगढ जि. अलवर राज्यस्थान) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत तरुणाच्या भावाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात ऑक्टोबर महिन्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 306, 384 सह आयटी अ‍ॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला होता.

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

आरोपींनी फिर्यादी यांना एक अर्धनग्न फोटो पाठवला होता. फिर्यादी यांनी फोटो ओपन करुन पाहिला असता तो फोटो 19 वर्षाच्या लहान भावाचा होता. तो फोटो व्हिडीओचा स्क्रिनशॉट होता. फोटो पाठवल्यानंतर आरोपींनी फोटो लगेच डिलीट केला. यानंतर भावाच्या मैत्रीणीने फिर्यादी यांना फोन करुन सांगितले की, कोणीतरी इन्स्टाग्रामवरुन (Instagram) न्यूड व्हिडीओ कॉल (Nude Video Call) करुन, ब्लॅकमेल (Blackmail) करुन पैसे मागत असून त्याने 4500 रुपये दिल्यानंतर देखील आणखी पैशांची मागणी करत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी भावाला फोन केला मात्र त्याने फोन उचलला नाही. यानंतर फिर्य़ादी हे घरी गेले असता भावाने 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर विधी साठी कुटुंबीय गावी गेले होते. ते परत आल्यावर मृत मुलाच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन फिर्याद दिली.

आरोपीच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला

अन्वर सुबान खान (वय-29 रा. गुरुगोठडी ता. लक्ष्मनगढ जि. अलवर राज्यस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सायबर गुन्हे तपासाचे पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन व लोकेशनद्वारे आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस आरोपीला घेऊन येत असताना त्याच्या नातेवाईकांनी आणि गावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. याच संधीचा फायदा घेत आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. मात्र, पोलिसांनी आरोपीचा अडीच किलोमिटर पाठलाग करुन ताब्यात घेतले.

40 हजार रुपये घेऊन प्रशिक्षण

महाराष्ट्रात तसेच देशभरात ऑनलाईन सेक्सटोर्शन (Online Sextortion) करुन खंडणी मागण्याचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा अन्वर शेख हा मास्टरमाईड आहे. अन्वर शेख हा गुरुगोठडी (Gurugothadi) गावातील मुले व महिलांना याचे प्रशिक्षण देत होता. यासाठी तो त्यांच्याकडून 40 हजार रुपये घेत होता, अशी माहिती त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत समोर आल्याचे सिंहगड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (Sinhagad Division ACP Sunil Pawar) यांनी सांगितले.

पोलिसांचे तरुणांना आवाहन

अशा प्रकारे कोणी ऑनलाइन सेक्सटॉर्शनला बळी पडले असतील किंवा यापूर्वी अशा प्रकारे फसवणूक झाली असेल
तर जवळच्या सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. अथवा दत्तवाडी पोलीस ठाण्यात 020-24220205 या
क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ऑनलाइन सेक्सटॉर्शनला बळी न पडता,
भयभीत न होता पोलिसांकडे तक्रार करावी.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 सोहेल शर्मा (DCP Suhail Sharma),
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन
(Senior Police Inspector Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे
(Police Inspector Vijay Khomane) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील
पोलीस उपनिरीक्षक अक्षय सरवदे (PSI Akshay Sarvade), पोलीस अंमलदार काशिनाथ कोळेकर,
जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Sextortion: Mastermind who demanded ransom by online blackmail, Pune police arrested mastermind from Rajasthan

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

IND vs NZ 3rd T20 | भारत आणि न्यूझीलंड सामना हॉटस्टारवर नाहीतर ‘या’ अ‍ॅपवर पाहता येणार