Pune Crime | धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची येथे महिलेची 2 वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आळंदी म्हातोबाची (Alandi Mhatobachi) याठिकाणी एका 30 वर्षाच्या महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी (Jumping Well) घेऊन आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) संध्याकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. कविता देविदास भोसले Kavita Devidas Bhosale (वय-30 रा. भेकराईनगर, मूळ गाव उमरगा, जि. उस्मानाबाद) व प्रणीत भोसले Praneet Bhosale (वय-2) असं लहान मुलासह आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता (Missing) असल्याची तक्रार कविताच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) दिली होती. त्यानुसार हडपसर पोलीस कविता आणि लहान मुलाचा शोध घेत होते. दोघांचा शोध घेत असताना कविताच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन आळंदी म्हातोबा येथे आढळून आले.

लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) आणि हडपसर पोलिसांनी आळंदी म्हातोबाची परिसरात कविताचा शोध घेतला.
शोध घेत असताना गायकवाड वस्ती येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह शुक्रवारी सहाच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला.
त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता हा मृतदेह कविताचा व तिच्या मुलाचा असल्याचे आढळून आले आहे.
लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहचले असुन पुढील कारवाई सुरु आहे.

Web Titel :- Pune Crime | she ended his life jumping well 2 year old boy alandi mhatobachi pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,524 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Trap | 40 हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यासह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Crime News | भाजपच्या महिला पंचायत समिती सदस्याची आत्महत्या, प्रचंड खळबळ