Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,524 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra |राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज (शुक्रवार) थोडी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज काही प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या ही कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या चार हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 4 हजार 154 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 4 हजार 524 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 62 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.05 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 44 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 49 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 57 लाख 02 हजार 628 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 91 हजार 179 (11.65 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 96 हजार 579 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,952 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title :  Coronavirus in Maharashtra | 4,524 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Trap | 40 हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यासह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Crime News | पतीने हुंड्यासाठी लावला तगादा; पत्नीने गळफास घेवून संपवलं जीवन, पोलिस पतीला अटक

Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांसाठी होणार भरती, परीक्षेविना थेट नियुक्ती