Pune Crime | पुणे शहरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये रिक्षा चोरणाऱ्या (Auto Rickshaw Thief) अट्टल गुन्हेगाराला (Criminal) शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar police) अटक (Arrest) केली आहे. आरोपीकडून चोरीची रिक्षा जप्त करुन रिक्षा चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. अशोक उर्फ संतोष चंद्रकांत ढेरे Ashok alias Santosh Chandrakant Dhere (वय-46 रा. आळंदी गाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर यापूर्वी 14 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न (Pune Crime) झाले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) कोर्ट परिसरातून एक अॅटो रिक्षा (Auto Rickshaw) (एमएच 12 क्युआर 9158) चोरीला गेल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Crime Branch Unit 3) पोलिसांना हा गुन्हा अशोक ढेरे याने केल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी आरोपीला येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) बाहेर येताच ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले होते. (Pune Crime)

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीची रिक्षा जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला. आरोपीवर यापूर्वी 14 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 डॉ. प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Naranware),
सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग रमाकांत माने (ACP Ramakant Mane),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More),
पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसारगर (PSI Atul Kshirsagar), पोलीस अंमलदार भिवरे, कांतिलाल गुंड, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, शरद राऊत यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Shivajinagar police arrest a notorious criminal who stole a rickshaw in Pune city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर,
बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा