Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर, बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Best Foods For Sound Sleep | रेग्युलर स्लीप पॅटर्न एकूणच आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते, तणाव कमी होतो. काही पदार्थांचे सेवन करूनही तुम्ही निद्रानाशाच्या समस्येवर मात करू शकता. काही असे फूड्स (Foods) जाणून घेवूयात जे रात्री झोपण्यापूर्वी (Sound Sleep) एक तास आधी खाल्ल्याने चांगली झोप लागू शकते. (Best Foods For Sound Sleep)

 

1. गरम दूध प्या (Drink hot milk)
रात्री गाढ झोपण्यासाठी कोमट दूध पिणे चांगले मानले जाते. चांगल्या झोपेसाठी हे उत्तम पेय आहे. तुम्ही हळद (Turmeric), वेलची पावडर (Cardamom powder), बदाम (Almond) एकत्र करून पिऊ शकता, यामुळे चव सुधारते आणि आरोग्यदायी देखील आहे. कोमट दूध (Warm milk) चांगल्या झोपेला प्रोत्साहित करते.

 

2. डार्क चॉकलेट (Dark chocolate)
जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. मात्र जास्त सेवन होणार नाही याची काळजी घ्या. एका दिवसात एक लहान तुकडा पुरेसा आहे. कोणतेही अन्न मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास शरीराला अधिक फायदा होतो. मात्र, शांत झोपेसाठी फक्त डार्क चॉकलेटवर अवलंबून राहू नका. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक दीर्घकाळात तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो.

 

3. नट्स (Nut)
दररोज झोपण्यापूर्वी 5 ते 6 बदाम, 1 अक्रोड (Walnuts) आणि मूठभर मखाना हे चांगल्या झोपेसाठी उत्तम स्नॅक्स मानले जाते, कारण त्यात झिंक, मॅग्नेशियम (Magnesium) आणि कॅल्शियम (Calcium) सारखी आवश्यक खनिजे असतात. मात्र, त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. झोपण्यापूर्वी 10-15 बदाम किंवा 5 अक्रोड खायचे, असे करू नका.

4. फळे खा (Eat fruit)
रात्री झोपण्यापूर्वी चेरी (Cherry), बेरीज (Berry), किवी (Kiwi), केळी (Bananas), अंजीर (Fig) इत्यादी खाऊ शकता, यामुळे झोप न येण्याची समस्या दूर होते. त्यामध्ये अशी काही पोषकतत्व असतात, जी झोप सुधारतात. ओट्स, चिया सिड्स एकत्र शिजवून सेवन करा. चांगली झोप येईल.

 

5. हर्बल टी (Herbal Tea)
काही लोकांना रात्री चहा, कॉफी पिऊन झोपण्याची सवय असते, जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय बदला. त्याऐवजी हर्बल टी घ्या. झोपण्यापूर्वी एक कप हर्बल टी प्या, झोप शांत लागेल.

 

वाईट सवयी ज्या झोपेवर करतात परिणाम

 

स्लीप हायजीन पॅटर्न (Sleep hygiene pattern), इतर पर्यावर्णीय घटक आणि दिनचर्या याकडे लक्ष द्या.

रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय सोडून द्या.

अल्कोहोल, धूम्रपान, कॅफिन आणि जंक आणि प्रक्रिया केलेले फूड टाळा.

रात्री उशिरा जेवण्याची सवय सोडा.

उशिरा जेवून झोपायला गेल्यास अन्न लवकर पचत नाही.

उशीरा झोपल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका वाढतो.

जास्त मसालेदार आणि चरबीयुक्त अन्न खाऊ नका.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Best Foods For Sound Sleep | health news 5 foods to have before going to bed for sound sleep

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | ‘सरकारमध्ये जे चालले आहे त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली’; सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?

 

Breakfast Tips | सकाळी उठून नाश्त्यात खा ‘या’ 2 गोष्टी, होतील जबरदस्त लाभ, अनेक आजार राहतील दूर

 

देशातील ‘या’ 7 मार्गावरून धावणार हाय स्पीड Bullet Train, रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती, जाणून घ्या रूट