Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय तरूणाची आत्महत्या; लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला असून लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) तरुणाच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

महावीर उत्तम जगदाळे (वय ३२, रा. उरळी कांचन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल उत्तम जगदाळे (वय ५८, रा. करमाळा) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर जगदाळे यांचे ७ ते ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो मिळेल तेथे मोलमजुरी करीत असे. त्याची पत्नी एका बांधकाम व्यावसायिकाकडे साईट दाखविण्याचे काम करते. लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने महावीर हा काही महिने गावाला गेला होता. तेथून परत आल्यानंतरही तो काही काम करीत नसल्याने पती पत्नीत भांडणे होत होती. ही बाब त्याच्या पत्नीने आपल्या सासर्‍यांना सांगून त्यांना पुण्याला बोलावून घेतले होते. त्यांनी येऊन समजून सांगितले होते. त्यानंतर ८ दिवसांनी ८ नोव्हेबरला रात्री महावीर याने घरी गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime) केली. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! 32-year-old man commits suicide in Pune Incidents in the Loni Kalbhor area wife harassment cases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WhatsApp Disappearing Messages | ‘हे’ फीचर कसे करते काम, असे करा Enable आणि Disable, वाढेल फोनचा स्पीड

Pune Crime | ‘चेअरमनने किया वैसाही मै करुंगा’ ! सोसायटी चेअरमनविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी केला विनयभंग

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन