Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मोबाईलच्या कारणावरून मामाने भाचाच्या पोटात खुपसला चाकू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राकडे राहिलेला मोबाईल आणण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या मामाने स्वतःच्या 17 वर्षीय भाच्याच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मार्केट यार्ड (Marketyard) येथे 24 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी (Marketyard Police Station) मामाला अटक केली असून जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune Crime)

 

संजय गोकुळ परदेशी (वय 38, रा आनंद नगर, मार्केट यार्ड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई मीना गोकुळ परदेशी (वय 65) यांनी फिर्याद दिली आहे. तर पियुष असे जखमी मुलाचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय परदेशी याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो वेल्डिंगची मिळेल तशी कामे करतो. त्याची आई मीना परदेशी या मिळेल ते काम करून कुटुंब चालवितात. जखमी पियुष हा आरोपी संजय परदेशी यांच्या बहिणीचा मुलगा आहे. पियुष एक वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून तो मामाच्या घरी राहतो. (Pune Crime)

 

घटनेच्या दिवशी आरोपी संजय हा रात्री दारू पिऊन आला. त्याचा मोबाईल मित्राकडे विसरलेला होता. त्यांनी आई मीना यांना हा मोबाईल घेऊन येण्यास सांगितले.
मात्र आईने मी आत्ताच कामावरून आले असुन थकले असल्याचे सांगत मोबाईल आणण्यास नकार दिला. दरम्यान त्यावरून घरामध्ये वादावादी सुरू झाली.
पियुष याला आरोपीने मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. परंतु आरोपी आजीसोबत भांडत असल्याने त्याने सुद्धा मोबाईल आणून देण्यास नकार दिला.
चिडलेल्या आरोपीने या दोघांना घराबाहेर काढून दाराची कडी लावून घेतली.

या दोघांनी ते दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने दार उघडून त्याच्या हातातील चाकु पियुष याच्या पोटात खुपसला.
पियुष या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मुंढे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! In Pune, uncle stabbed his nephew in the stomach due to mobile phone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2022 | अर्थसंकल्प 2022 : कोरोनाने प्रभावित छोट्या दुकानदारांसाठी होऊ शकते भरघोस मदतीची तरतुद, सरकार देऊ शकते आर्थिक मदत

 

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 54 जणांवर कारवाई

 

Amit Deshmukh | कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या 12116 वारसांना प्रत्येकी 50 हजारांची मदत – मंत्री अमित देशमुख