Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | परिसरात राहणार्‍या महिलेने दिलेल्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षाच्या तरुणाने स्वत:च्या अंगावर रॉकेल (Pune Crime) ओतून पेटवून घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

 

दत्तात्रय तानाजी ढावरे (वय ४०, रा. लोहियानगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी राहण्यास आहे. आरोपी महिलेने फिर्यादी यांचे पती दत्तात्रय ढावरे यांना मानसिक व शारीरीक त्रास दिल्याने तिच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून ढावरे यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून  घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. सहायक पोलीस निरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Shocking! Young man commits suicide in lohiyanagar of khadak police station area of Pune

Pune Crime | Shocking! Young man commits suicide in lohiyanagar of khadak police station area of Pune

Avoid Fake Fastag | ऑनलाईन विकला जातोय बनावट Fastag, सरकारने सांगितले बचावाची पद्धत

Mumbai School Reopen | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘मुंबईत उद्यापासून शाळा सुरु होणार नाहीत, तर…’

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश 

83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर ‘अशी’ कमवली ‘इज्जत’, रणवीर सिंगच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चहाते म्हणाले – ‘सुपर हिट’ (व्हिडिओ)

Aishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं होतं ‘बेइज्जत’, दोघांमध्ये 36 चा आकडा; जाणून घ्या दुश्मनीचं कारण