Pune Crime | गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणारी आंतरराज्य टोळी सिंहगड पोलिसांकडून गजाआड, 15 लाखाचे 84 महागडे मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सध्या पुण्यामध्ये गणेशोत्सवाची (Ganesh Festival) धामधूम सुरु आहे. या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन पुणे शहरातील विविध (Pune Crime) भागातून मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला (Interstate Gang) सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 15 लाख 25 हजार रुपये किमतीचे 84 मोबाईल जप्त (Mobile seized) करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.1) फनटाईम थेटरच्या (Funtime Theatre) मागील रस्त्यावर करण्यात आली.

 

 

शरथ मंजुनाथ (वय-21 रा. भद्रावती शिमोगा, कर्नाटक), केशवा लिंगराजु (वय-24 रा. भोवी कॉलनी, भद्रावती शिमोगा, कर्नाटक), नवीन हनुमानथाप्पा (वय-19 रा.उुडुकलांबा मंदीराजवळ, हौसमाने भद्रावती शिमोगा, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते पुण्यात फिरस्ते आहेत. (Pune Crime)

 

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून ठिकठिकाणी भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांकडून मोबाईल चोरण्यात (Stealing Mobile) येत होते. सिंहगड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Police Station) तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सराईत मोबाईल चोर फनटाईम थेअटरच्या मागील रोडवर थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार देवा चव्हाण (Deva Chavan), राहुल ओलेकर (Rahul Olekar), शिवाजी क्षीरसागर (Shivaji Kshirsagar) यांना मिळाली. पथकाने त्याठिकाणी सापळा रचून तिन जणांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे असलेल्या बॅगांची पाहणी केली असता शरथ मंजुनाथ याच्याकडे असलेल्या बॅगेतून अॅपल (Apple), विवो (Vivo), ओपो (Oppo), सॅमसंग (Samsung), रेडमी (Redmi), रिअलमी (Realme) कंपनीचे 42 हॅडसेट मिळाले. तर केशवा लिंगुराजु याच्या बॅगेत 41 मोबाईल हॅडसेट आणि नवीन हनुमानथाप्पा याच्या पॅटच्या खिशात एक मोबाईल असे एकून 15 लाख 25 हजार रुपयांचे 84 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी मार्केटयार्ड भाजी मंडई (Market Yard), स्वारगेट बस स्थानक (Swargate Bus Station), बालाजीनगर (Balajinagar), कात्रज भाजी मार्केट (Katraj Vegetable Market), अभिरुची परिसर (Abhiruchi Campus), वडगाव भाजी मार्केट (Vadgaon Vegetable Market) व पुणे शहराच्या इतर गर्दीच्या ठिकाणावरुन मागील 10 दिवसांपासून मोबाईल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीसन निरीक्षक सचिन निकम करत आहेत. तसेच ज्या नागरिकांचे मोबाईल फोन चोरीस गेलेले आहेत त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) संपर्क (020-24268270) साधावा. अथवा अविनाश कोंडे 9764647964, देवा चव्हाण 8275720487 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam),
सहायक पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे,
शंकर कुंभार, अमित बोडरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, वैशाली क्षिरसागर, अविनाश कोंडे,
अमोल पाटील, विकास पांडुळे, विकास बांदल, दिपक शेंडे, सचिन गाढवे, नलिन येरुणकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Sinhagad police busted inter-state mobile phone
stealing gang, seized 84 expensive mobile phones worth Rs 15 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा