Pune Crime | ‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

पुणे : Pune Crime | घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की त्यात पत्नीच्या कानाचा पडदा फाटून गंभीर (Pune Crime) इजा झाली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी Sinhagad Road Police Station जावेद मुल्ला (वय ३१, रा. रायकरनगर, धायरी  ) याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय महिलेने फिर्याद (गु. र. नं. ४८६/२१) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहितेचा २७ एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत छळ केला जात होता. लग्नात हुंडा दिला नाही, तसेच घरगुती कारणावरुन तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. फिर्यादी यांचे स्त्री धनही स्वत:कडे ठेवून घेतले. जावेद मुल्ला याने मारहाण करताना फिर्यादी यांच्या कानावर इतका जोरात फटका मारला की त्यामुळे कानाचा पडदा फटून इजा झाली. त्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले.
तेव्हा पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेईल, अशी धमकी (Pune Crime) दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | sinhagad road police station case news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update