Pune Crime | 65 वर्षाच्या पतीने पुरेसा नाश्ता दिला नाही म्हणून 62 वर्षाच्या पत्नीशी केलं ‘हे’ कृत्य; त्यानंतर महिलेनं मुलगा अन् सुनेशी चर्चा करून उचललं मोठं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | त्याचे वय 65 आणि तिचे वय 62 वर्षे अनेक वर्षे संसार झाला. आता उतार वयात तिच्या च्याने आता काम पुरेसे होत नाही. तरीही तिने नास्ता दिला. पण तो पुरेसा नाही अशी तक्रार करत त्याने पत्नीला शिवीगाळ (Husband And Wife Quarrel) करुन जोरात धक्का मारला. त्यामुळे त्या किचनमधील फरशीवर पडून त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला. (Pune Crime)

याप्रकरणी एका ६२ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या ६५ वर्षाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. ही घटना भोसलेनगरमध्ये (Bhosale Nagar, Pune) २० मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भोसलेनगरमध्ये पती, मुलगा व सून यांच्यासह राहतात. त्यांनी आपल्या पतीला नाश्ता दिला होता. परंतु तो पुरेसा नास्ता दिला नाही, म्हणून पतीने त्यांना शिवीगाळ सुरु केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जोरात धक्का मारुन किचनच्या फरशीवर पाडले. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचा खुबा फ्रॅक्चर झाला आहे. तसेच उजव्या गुडघ्याला मुक्का मार लागला. या प्रकाराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुलगा, सून यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

 

Web Title : Pune Crime | The 65-year-old husband did not get enough breakfast so did the
‘this’ act with the 62-year-old wife; After that, the woman took a
big step by discussing with her son Ansune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त