Pune Crime | कुत्रे अंगावर गेल्याने कारची काच फोडून 44 हजार रूपये चोरले; नवी खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | पाळीव कुत्रे अंगावर गेल्यामुळे झालेल्या वादाचा राग मनात ठेवून घराजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक (Pune Crime) केली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नवी खडकी भागात (Khadki Area) हा प्रकार घडला.

प्रज्वल बाराथे (वय २०, रा. बाराथे वस्ती, सुभाषनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींच्या घरासमोरून जात असताना त्यांचे पाळीव कुत्रे आरोपीच्या अंगावर गेले. त्यावरून वाद झाला होता. फिर्यादीच्या जावयाने त्यांची कार नेताजी शाळेच्या प्रवेशव्दाराजवळ उभा केली होती. दरम्यान, कुत्रे अंगावर आल्याने झालेल्या वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी कारची पाठीमागील काच फोडून नुकसान केले तसेच कारमधील बॅगेत ठेवलेली ४४ हजार रूपयांची रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावर भेट देत एक रॉड जप्त केला आहे. प्रज्वल याच्यावर यापूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत. तसेच पाहिजे असलेल्या आरोपीविरोधात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणे, फरार आरोपीचा शोध घेणे, या गुन्ह्यात त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करण्यासाठी आरोपीस 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकिल बोधिनी (Assistant Public Prosecutor Bodhini) यांनी केली.

 

Web Title : Pune Crime | The dogs broke the glass of the car and stole Rs 44,000; Incidents in the New Rock area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bluetooth Security | ALERT ! अँड्रॉईड फोन आणि विंडोज 10 यूजर्सला मोठा धोका! समोर आला नवीन प्रकारचा धोकादायक व्हायरस

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 246 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aadhar Card मध्ये असेल गडबड तर ‘नो-टेन्शन’, फक्त ‘हे’ काम ताबडतोब करा; जाणून घ्या सर्वकाही