Pune Crime | आजारी मालकाचा गैरफायदा घेत ड्रायव्हरने केली 51 लाखांची फसवणूक; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपला मालक आजारी असल्याचा गैरफायदा घेऊन बांधकामासाठी पैशांची गरज असल्याने भासवून वेळोवेळी बँकेतून पैसे काढले. कागदपत्रावर सह्या घेऊन त्यांंची मोटार व मोटारसायकल विकून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) आरीफ ऊर्फ हनिफ सय्यद, हनिफ दस्तगीर सय्यद (वय ३९, रा. एन आय बी एम रोड, कोंढवा) व त्यांची पत्नी, बहिण, भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
याप्रकरणी शाहिन रफिक छागला (वय ४०, रा. कुल होम्स, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरीफ सय्यद हा फिर्यादी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. फिर्यादी यांचे पती आजारी आहेत. आरीफ याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वडगाव शेरी येथील बांधकाम साईटवरील वेगवेगळ्या कामासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे भासवले. त्याने पत्नी, भाऊ, बहिणीशी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडून २५ लाख रुपये बँकेतून काढून घेतले.
फिर्यादी यांची चारचाकी गाडी फिर्यादीच्या परवानगीविना आर टी ओ कडील टी टी फॉर्मवर खोटी सही करुन साडेसात लाख रुपयांना विकली. तसेच त्यांची मोटारसायकल घेऊन अशी एकूण ५१ लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केली. पोलिसांनी गुन्हा दाखल (Pune Crime) केला असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | The driver defrauded the sick owner of Rs 51 lakh; Shocking incident in Kondhwa, Pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध
Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर