Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Skin Care Tips-Raw Milk | आजच्या धापळीच्या जीवनात आपण चेहऱ्याकडे पुरेस लक्ष देत नाही आणि त्यामूळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ लागते . कच्चे दूध चेहऱ्यासाठी वरदान आहे. चेहऱ्यावरच्या सर्व समस्यांवर कच्चे दूध उत्तम उपाय म्हणून वापरता येऊ शकते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा मुलायम (plump skin secret) आणि चमकदार बनते. तुम्ही ते क्लिन्झर म्हणून वापरू शकता. दुधात असलेले लैक्टिक ऍसिड, सेलेनियम, खनिजे, जीवनसत्त्वे जसे A, D, E, आणि K आणि प्रथिने असतात (Skin Care Tips-Raw Milk).

 

कच्चे दूध हे सौम्य एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग एजंट (Hydrating agent) आहे. कोरड्या त्वचेसाठी हे उत्तम टोनर आहे. दुधाचे मास्क काळे डाग (Black Spots) साफ करण्यास, टॅनिंग (Tanning remedies) आणि पुरळ (Pimple Problem) बरे करण्यास मदत करतात. दुधात असणारे गुणधर्म त्वचेला आतून हेल्दी बनवतात आणि ग्लोइंग (healthy and glowing skin) बनवतात. कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे (सुरकुत्या, त्वचा सैल होणे इ.) टाळता येते. हे फायदे मिळवण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया. (Skin Care Tips-Raw Milk)

 

चेहऱ्यावर कच्चे दूध कसे लावावे –

कच्च्या दुधाचे नाईट मास्क बनवा
दुधात 1 टीस्पून बेसन घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात अर्धा चमचा मध आणि गुलाबपाणी घाला आणि साहित्य चांगले फेटून घ्या. रात्री चेहरा स्वच्छ करून हा मास्क 10 मिनिटे चेहरा आणि मानेवर लावा आणि कोमट पाण्याने धुवा.

कच्च्या दुधाने फेस मास्क बनवा
दुधाचा फेस मास्क चेहर्‍याची त्वचा ग्लोइंग करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यासाठी चिमूटभर मुलतानी मातीमध्ये ३ चमचे कच्चे दूध मिसळा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर चांगली लावा आणि सुमारे 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. फेस मास्क सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

 

कच्च्या दुधाचे स्क्रब बनवा
चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून चेहरा स्वच्छ करता येतो. यासाठी 1 चमचे साखर आणि 3 चमचे कच्चे दूध मिसळा. आता त्यात १ चमचा बेसन मिसळा. तिन्ही गोष्टींपासून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेला हलक्या हातांनी चोळा. ३ मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

 

कच्च्या दुधाचा मॉइश्चरायझर
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी कच्च्या दुधाचा मॉइश्चरायझर म्हणूनही वापर करता येतो.
यासाठी 3 चमचे कच्च्या दुधात अर्धा चमचा ग्लिसरीन मिसळा. आता हे मिश्रण कापसावर लावा आणि चेहरा आणि मानेला लावा.
सुमारे 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
कच्च्या दुधात बी-व्हिटॅमिन्स, अल्फा हायड्रॉक्सी ऍसिडस्, कॅल्शियम आणि इतर शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात
ज्यामुळे ते दररोज वापरल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.
हे त्वचेच्या पेशींचे आतून पोषण करते आणि तुमची त्वचा दिवसभर मॉइश्चरायझ ठेवते.
ते त्वचेच्या छिद्रांमधून अतिरिक्त सीबम देखील काढू शकते आणि दररोजच्या वापरानंतर मोठ्या छिद्रांना नाहीसे करू शकते.

 

Web Title :- Skin Care Tips-Raw Milk | applying raw milk on face is very beneficial know raw milk benefits for skin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patekar-Kiran Mane | नाना पाटेकर यांनी किरण मानेंना फटकारलं; म्हणाले – ‘राजकीय भूमिका कशाला हवी?’

 

Pune Crime | शिरूरमधील धक्कादायक घटना ! 8 नराधमांकडून महिलेवर बलात्कार

 

Lata Mangeshkar | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा