Pune Crime | MBA ची प्रवेश परिक्षा पास करुण देण्याची हमी देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | आंतरराष्ट्रीय स्तरावरील एमबीएची (MBA) प्रवेश परिक्षा उतीर्ण करुण देण्याची हमी देऊन (Pune Crime) पैसे उकळणा-या व्यक्तीस पुणे पोलिसांनी (Cyber Police) अटक केली आहे. संबंधीत व्यक्ती गुणांप्रमाणे अडीच लाख ते 4 लाख रुपये आकारत होता. यासाठी तो एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून प्रवेश परिक्षेबाबत वेबसाईटचा ऍक्‍सेस स्वत:कडे मिळवला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अभय मिश्रा (Abhay Mishra) (रा. मानगो, जमशेदपूर, झारखंड) असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, परदेशात एमबीए करणेकरिता प्रवेश घ्यावयाचा असल्याने फिर्यादींनी सोशल साईटवर जीमॅट या एमबीए पूर्व परिक्षेबाबत सर्च केले.
त्यांना GMAT_GRE_SHORTCUT ही इन्स्टाग्राम प्रोफाईल दिसून आली. त्यात प्रवेशाबाबत असणाऱ्या जीमॅट या पूर्व परिक्षेमध्ये 100 टक्के चांगल्या गुणांची हमी देण्यात आली होती.
त्यानुसार फिर्यादी यांनी सदर इन्टाग्राम प्रोफाईलद्वारे प्रोफाईल धारकाशी संपर्क साधून सर्व प्रक्रिया पूर्ण केली.
त्यानुसार 750 पेक्षा जादा गुणांकरिता 4 लाख, 740 पेक्षा जादा गुणांकरिता 3 लाख 70 हजार, 730 पेक्षा जागा गुणांकरिता 3 लाख 50 हजार, 720 पेक्षा जादा गुणांकरिता 3 लाख,
710 पेक्षा जादा गुणांकरिता 2 लाख सत्तर हजार आणि 700 पेक्षा जादा गुणांकरिता 2 लाख 50 हजार अशी रक्कम असल्याचं आरोपी मिश्रा यांनी सागितले.

यानंतर आरोपी यांनी फिर्यादी यांच्या संगणकाचा ऐनीडेस्क, डीडब्ल्यू सर्व्हिसेस व वुई ट्रान्सफर या ऍप्लीकेशनद्वारे ऍक्‍सेस घेऊन आंतराष्ट्रीय एमबीएची पूर्व परिक्षा फिर्यादी स्वता देत आहेत.
असं भासवुन यातील आरोपी यांनी पूर्व परिक्षा दिली.
त्यात फिर्यादी याला खरोखरच 850 पैकी 770 गुण मिळाले. त्यामुळे आरोपी यांनी सतत 4 लाख रूपयांचा तगादा लावला.
फिर्यादी यांना रक्कम द्यावयाची नसल्याने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच. त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
यानतंर आरोपी विरोधात सायबर पोलीस स्टेशन (Cyber Police Station, Pune) माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा (Pune Crime) दाखल झाला आहे.

 

दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस व तपास पथक यांनी जमशेदपूर झारखंड येथे सापळा रचून आरोपीस अटक केले. त्याच्याकडून 1 लॅपटॉप, 1 मोबाईल संच, 4 पेनड्राईव्ह, 4 डेबीट कार्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ PI डी.एस. हाके (Sr PI D.S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय मिनल सुपे-पाटील (PI Minal Supe-Patil), पीएसआय रविंद्र गवारी (PSI Ravindra Gawri), अंमलदार अस्लम आत्तार,
राजकुमार जाबा, शाहरूख शेख, श्रीकांत कबुले, शिरीष गावडे व निलम साबळे यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Pune Crime | The police smiled at the person who promised to pass the MBA entrance exam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | वकील महिलेकडे खंडणी मागणार्‍या दोघा सराईतांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

BSNL ‘या’ ग्राहकांना देतंय 4 महिन्यापर्यंत फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस, जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही?, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं…