Pune Crime | क्रेडिट कार्ड घेण्याचा मोह शिक्षिकेला पडला दीड लाखांना; कार्डवरील सर्व्हिसेस डि अ‍ॅक्टीव्ह करण्याच्या नावाखाली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिक्षिका (Teacher) असलेल्या महिलेने खर तर क्रेडिट कार्डचा (Credit Card) कधी वापर केला नव्हता. सायबर चोरट्या (Cyber Crime) महिलेने त्या क्रेडिट कार्डवर २ सर्व्हिसेस अ‍ॅक्टीव्ह झाल्या असल्याचे सांगून त्याचे ४९ हजार चार्जेस लागतील, ते पडू नये, म्हणून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन दीड लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातला. (Pune Crime)

 

याप्रकरणी आंबेगाव येथे राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१७/२२) दिली आहे. हा प्रकार ४ मार्च २०२२ रोजी घडला होता. (Pune Crime)

 

फिर्यादी या शिक्षिका असून त्यांचे पती सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतात.
त्यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) नवीन क्रेडिट कार्ड घेतले होते.
मात्र, त्याचा वापर कधी केला नव्हता. ४ मार्च रोजी त्यांना आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचा एका महिलेचा फोन आला.
तुमच्या क्रेडिट कार्डवर दोन सर्व्हिसेस अ‍ॅक्टीव्हेट झाल्या आहेत.
त्या सर्व्हिसेस डी अ‍ॅक्टीव्हेट (Services D Activate) केल्या नाहीतर तर तुम्हाला ४९ हजार रुपये चार्जेस पडतील, अशी भिती दाखविली.
आपल्याला ४९ हजार रुपये भरायला लागू नये, म्हणून ती महिला सांगेल, त्याप्रमाणे फिर्यादी कृती करीत गेल्या.
तिने या सर्व्हिसेस डी अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर पाठविलेला एक कोड सांगा असे सांगितले.
त्यांनी मेसेजमधील कोड तिला सांगितला. (Pune Crime)

त्यानंतर तिने फिर्यादी यांना आय मोबाईल अ‍ॅप्लीकेशन (I Mobile Application) उघडण्यास सांगितले.
त्यासाठी कोणतेही चार्जेस पडणार नाहीत,
असे म्हणल्यावर फिर्यादी यांनी मोबाईलमधील आय मोबाईल अ‍ॅप्लिकेशन उघडून ती महिला सांगेल, त्याप्रमाणे स्टेप्स करत गेल्या.
त्यानंतर त्यांना त्याचवेळी आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती विचारल्यानंतर त्यांनी त्यावर विश्वास ठेवून सर्व माहिती दिली.
त्यानंतर १० ते १५ मिनिटात त्यांच्या मोबाईलवर ९९ हजार १४४ व ५० हजार ८२२ रुपये क्रेडिट कार्डवरुन कट झाल्याचे मेसेज प्राप्त झाले.
त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) संपर्क साधून तक्रार दिली.
त्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalskar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : – Pune Crime | The teacher was tempted to take a credit card for one and a half lakhs Fraud under the guise of deactivating services on the card

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा