Pune Crime | चऱ्होली येथील श्री वाघेश्वर महाराज मंदिरातील चोरी

दिघी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चऱ्होली बुद्रुक (Charholi Budruk) येथील श्री वाघेश्वर महाराज मंदिरातील (Shri Vagheshwar Maharaj Temple) तीन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील रक्कम चोरुन (theft) नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चऱ्होली बुद्रुक येथे (Pune Crime) मंगळवारी (दि. 3) रात्री दहा ते बुधवारी (दि.4) पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. चोरट्यांनी तीन दानपेट्यातून 30 हजार रुपये चोरुन नेले आहेत.

याप्रकरणी ज्ञानेश्वर विठ्ठल पठारे (वय-48 रा. राठी भोसले वस्ती, चऱ्होली बुद्रुक ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi police station) फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील तीन
दानपेट्यांचे कुलूप तोडले. चोरट्यांनी दानपेट्यामध्ये असलेली तीस हजार रुपये रोख रक्कम चोरून
नेली. तसेच मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV) केबल वायर तोडली. चोरट्यांनी श्री वाघेश्वर
महाराज मंदिरातील दान पेट्यांचे कुलूप तोडून नुकसान केले. पुढील तपास महिला पोलीस
उपनिरीक्षक माने (police sub-inspector Mane) या करीत आहेत.

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! आयुष्मान भारत अंतर्गत मुलांना 5 लाखापर्यंतचा फ्री आरोग्य विमा

Kumar Mangalam Birla | कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला वोडाफोन आयडियाच्या नॉन एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा

Sharad Pawar | शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Theft from Shri Wagheshwar Maharaj Temple at Charholi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update