Sharad Pawar | शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Union Home Minister Amit Shah) दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधकांची बैठक बोलवली असताना शरद पवार (Sharad Pawar) शहांच्या भेटीसाठी गेले. आता हे दोन दिग्गज नेते पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये अमित शहा एका नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यात (Pune) येत आहेत. याच दौऱ्यात शहांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasantdada Sugar Institute) भेट द्यावी, असे आग्रहाचे निमंत्रण शरद पवार यांनी दिल्याचे समजतेय.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अमित शहा पुण्यात येणार आहेत. याची कल्पना असल्याने शरद पवार यांनी शहांना जिल्ह्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण (Invitation) दिलं. त्यावर शहांनी होकार दिला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या दोन्ही नेत्यांची पुन्हा एकदा भेट होण्याची दाट शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट साखर क्षेत्रातील देशातील एक प्रमुख संस्था आहे. साखर क्षेत्राचे प्रश्न जाणून घेण्यासाठी इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या, अशा स्वरुपाचं निमंत्रण पवारांनी शहा यांना दिले आहे.

दरम्यान, शरद पवारांनी गेल्याच महिन्यात 17 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली होती. त्यानंतर लगेच 3 ऑगस्ट रोजी अमित शहांची भेट घेतली. यानंतर आता शरद पवार यांनी शहांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिले आहे. त्यामुळे भेटीगाठींचा सिलसिला सुरुच राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र, या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजयकी वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar invites amit shah vasantdada sugar institute pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल! वर्षभरात 1 लाखाचे झाले रू. 32 लाख, एक्सपर्ट देत आहेत खरेदीचा सल्ला

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! आयुष्मान भारत अंतर्गत मुलांना 5 लाखापर्यंतचा फ्री आरोग्य विमा

Coronavirus | अलर्ट ! मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका? जाणून घ्या कशाप्रकारे करावा त्यांचा व्हायरसपासून बचाव