Pune Crime | चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज केला लंपास

पुणे / बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | काही दिवसापासून तालुक्यात चोरीच्या (Theft) घटनांमध्ये वाढ (Pune Crime) झाली. या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान असतानाच आता चोरट्यांनी देवालाही सोडले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शिर्सुफळ (Shirsuphal) येथील प्रसिद्ध शिरसाई मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देवीचे सोन्या-चांदीचे दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून आज सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस येताच गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिर्सुफळ येथील शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. आज पहाटे काकड आरतीसाठी पुजारी आणि गावकरी मंदिरात गेले असता त्यांना मंदिराचा दरवाजा तोडल्याचे निदर्शनास आले. सर्वांनी मंदिरात जाऊन पाहिले तर देवीचे सोन्या-चांदीचे दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज नसल्याचे दिसले. याची खबर पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिसांचे एक पथक दाखल झाले. (Pune Crime)

दरम्यान, पोलिसांनी (Police) मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पाहिले त्यावेळी त्यांना एक महिला आणि दोन पुरुष आढळून आले.
या फुटेजसह तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चोरीच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेध म्हणून गावकरी आणि व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे.

Web Title :-  Pune Crime | Thieves break down temple door and steal Rs 3 lakh along with gold and silver jewelery

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात Lockdown की कडक निर्बंध? CM उद्धव ठाकरे घेणार निर्णय

 

Corona Vaccination in India | देशात लसीकरणाचा 150 कोटींचा टप्पा पार; पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे उघडा अकाऊंट, दर महिना मिळेल 2500 रुपयांची उत्पन्न; जाणून घ्या