Pune Crime | झारखंडमधील चोरट्यांना लोणीकंद पोलिसांकडून अटक, तब्बल दीड कोटी रुपयांचे अ‍ॅपल कंपनीचे 197 मोबाईल, 3 लॅपटॉप, 7 आयपॅड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या झारखंड (Jharkhand) येथील टोळीच्या लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 53 लाख 98 हजार 100 रुपयांचे 197 अ‍ॅपल कंपनीचे मोबाईल (Apple Mobile Phone) जप्त केले आहेत. चोरट्यांनी रविवारी (दि. 24) वाघोली परिसरातील प्रो कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन लिमीटेड कंपनीचे गोडावून मधून चोरी (Pune Crime) केल्याची कबूली दिली.

 

अब्दुल हाय अबुजार शेख (वय-20 रा. मु.बोलटोला, जि. साहेबगंज, झारखंड सध्या रा. चाकण), अबेदुर मुफजुल शेख (वय-34 रा. मु. मुंजुरटोला, जि. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर सुलतान अब्दुल शेख (वय-32 रा. मु. इब्राहिमटोला, रा. साहेबगंज), अबुबकर अबुजार शेख (वय-23 रा. मु. उत्तर पियारपुर जि. साहेबगंज, सध्या रा. चाकण), राबीवुल मुंटु शेख (वय-22 रा. मु. पियारपुर, जि. साहेबगंज, झारखंड सध्या रा. चाकण) हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. ही कारवाई लोणीकंद-केसनंद रोडवर (Lonikand-Kesnand Road) सोमवारी (दि.25) केली. (Pune Crime)

 

केसनंद रोडवर पाच ते सहाजण भारत पेट्रोलियम पंपाच्या समोर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Lonikand Police Station) पोलीस नाईक विनायक साळवे (Police Naik Vinayak Salve) आणि कैलास साळुंके (Kailas Salunke) व साई रोकडे (Sai Rokade) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले तर त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 7 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये दोन मोबाईल, दोन स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पक्कड, कोयता, दोरी असे दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी 24 जुलैला वाघोलीतील प्रो कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड कंपनीचे (Pro Connect Supply Chain Solutions Limited Company) गोडावून मधून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तब्बल 197 अ‍ॅपल कंपनीचे मोबाईल, 3 लॅपटॉप (Laptop), 7 आयपॅड (iPad), व इतर अ‍ॅसेसिरीज जप्त केली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar),
पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (Police Inspector Maruti Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव (API Gajanan Jadhav),
निखिल पवार (API Nikhil Pawar), पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे (PSI Suraj Gore),
पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, विनायक साळवे, अजित फरांदे, कैलास साळुंगे, सागर जगताप,
अमोल ढोणे, साई रोकडे, पांडुरंग माने, समीर पिलाणे, दिपक कोकरे, आशिष लोहार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Thieves in Jharkhand arrested by pune Lonikand police, 197 mobile phones, 3 laptops, 7 iPads of Apple company

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tiger Shroff-Disha Patani Breakup | टायगर श्रॉफ-दिशा पटानीचे ब्रेकअप, 6 वर्षांच्या डेटिंगनंतर नाते संपले!

 

Bengal SSC Scam | माझ्या घराचा मिनी बँकप्रमाणे वापर करत होता पार्थ चटर्जी – अर्पिता मुखर्जीचा दावा

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?