Pune Crime | पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास धमकावले; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेट्रोच्या स्टेशनच्या (Pune Metro Station) कामासाठी कामगार पुतळा येथील झोपडपट्टीचे (Kamgar Putala) स्थलांतर करण्याचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणच्या बहुतांश ठिकाणचे बहुतांश झोपडीधारक दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. काही जण मात्र अजूनही तेथेच आहेत. तेथील घरे पाडत असताना अधिकार्‍यांना विरोध करुन अंगावर धावून जाऊन अ‍ॅट्रासिटीची (Atrocity Act) तक्रार देऊ, अशी धमकी देणार्‍या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

महेंद्र मच्छिंद्र कांबळे (वय ४६) आणि गणेश मच्छिंद्र कांबळे (वय ४४) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे महापालिकेचे (Pune Corporation) कनिष्ठ अभियंता अभिजित टेंभुर्णे (Junior Engineer Abhijit Tembhurne) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्यादी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार पुतळा येथील महेंद्र कांबळे यांचे घर पाडण्याचे काम सुरु असताना दोघे जण तेथे आले. (Pune Crime)

आमच्या घरावर कारवाई करायची नाही़ आम्ही येथूून जाणार नाही. आम्हाला घराबाहेर काढू नका, तुम्ही आमच्यावर अन्याय करीत आहात, असे म्हणून तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत अंगावर धावत येऊन तुमच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीप्रमाणे तक्रारी देऊ, असे म्हणून आमच्या जिवाचे बरेवाईट करुन घेऊ, अशी धमकी दिली. शिवीगाळ करुन घरातच बसून राहून घरातून बाहेर निघण्यास विरोध करुन अंगावर धावत येऊन सरकारी कामात अडथळा आणला आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :-  Pune Crime | Threatened junior engineer of Pune Municipal Corporation Filed a case at Shivajinagar police station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Symptoms |ओमिक्रॉनची सुरुवातीची लक्षणे कोण-कोणती आहेत? जाणून घ्या ती शरीरात किती दिवसात दिसतात

 

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

 

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीची कारवाई ! स्वस्तात सोनं देण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणारी टोळी गजाआड