Omicron Covid Symptoms |ओमिक्रॉनची सुरुवातीची लक्षणे कोण-कोणती आहेत? जाणून घ्या ती शरीरात किती दिवसात दिसतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Symptoms | गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 व्हायरस (Coronavirus) आणि त्याच्या बदलत्या स्वरूपामुळे लोक खूप चिंतेत आहेत. या Covid-19 व्हायरसला समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी, तज्ञ सतत संशोधन करत आहेत जेणेकरून या व्हायरसवर नियंत्रण ठेवता येईल. गेल्या काही महिन्यांपासून भारतात या व्हायरसची प्रकरणे थांबली होती. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा (Corona Third Wave) धोका टळण्याची शक्यता वर्तवली जात होती. (Omicron Covid Symptoms)

 

हा व्हेरिएंट प्रथम दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळला होता, जो आता भारतातही पोहोचला आहे. कोविड-19 च्या या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी, त्याची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. भारतात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या सतत वाढत आहे, जी आता 3071 वर पोहोचली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटची वाढती प्रकरणे लोकांसाठी त्रासदायक ठरत आहेत, त्यामुळे या आजाराची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. (Omicron Covid Symptoms)

 

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या बातमीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट कोरोना (कोविड-19) च्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक आहे आणि त्याचा प्रसारही वेगाने होतो. त्याची बहुतेक लक्षणे कोविड-19 च्या डेल्टा व्हेरिएंटसारखी आहेत. कोरोनाच्या या व्हेरिएंटची लक्षणे (Omicron Covid Synonyms) काय आहेत आणि ती कशी टाळता येतील ते जाणून घेऊयात…

Omicron च्या या लक्षणांबाबत रहा सतर्क

त्वचेत होणारे बदल (Changes In Skin) :
Omicron च्या या प्रकाराचा संसर्ग झाल्यावर, त्वचा, नखे आणि ओठांचा रंग पिवळे, ग्रे किंवा निळा होऊ लागतो. त्वचेच्या रंगात हा बदल रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतो.

 

सर्दी-खोकला आणि ताप (Cold-Cough and Fever) :
संक्रमित व्यक्तीला सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि खाज सुटू शकते. ओमिक्रॉनच्या संपर्कात आल्यावर ताप आणि धाप लागणे देखील होऊ शकते.

 

स्नायू दुखणे, चव आणि वास कमी होणे (Muscle aches, Loss of Taste and Smell) :
संक्रमित व्यक्ती स्नायू दुखणे आणि डोकेदुखीची तक्रार करू शकते. व्हायरसच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती वास आणि चव देखील गमावू शकते.

 

ही लक्षणे देखील दिसू शकतात :
बद्धकोष्ठता (Constipation), झोपताना घाम येणे (Sweating While Sleeping),
डोळे सुजणे (Swelling Eyes) आणि त्वचेवर पुरळ (Acne On Skin) येणे ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत.

 

किती दिवसात दिसतात Omicron ची लक्षणे :
कोरोनाच्या या व्हेरिएंटची लक्षणे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर 2 ते 14 दिवसांच्या दरम्यान शरीरात दिसू लागतात.
व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर शरीरात लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करा.
स्वतःला क्वारंटाइन करा जेणेकरून या विषाणूचा संसर्ग थांबू शकेल.

 

Web Title :- Omicron Covid Symptoms | what are the symptoms of the covid 19 omicron variant know how to recognise it AS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Thyroid And Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड आणि थायरॉईडच्या रूग्णांनी ‘या’ एका भाजीपासून राहावे दूर, जाणून घ्या काय खाणे ठरू शकते धोकादायक

 

Pune Crime | सातारा रोडवर PMPML प्रवासात 1 लाखांचे दागिने लंपास

 

PPF Calculator | ‘या’ खास ट्रिकने पीपीएफमध्ये जमा करा पैसे ! व्हाल 1.5 कोटीचे मालक, जाणून घ्या कॅलक्युलेशन